krishi seva kendra.jpg 
मराठवाडा

शेती विषयक आस्थापनांसाठी दिलासा....काय ते वाचा  

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शेतकऱ्यांची खरीप पूर्व शेती विषयक कामाची निकड लक्षात घेता शुद्धीपत्रक ता. २४ एप्रिल मध्ये अंशत: बदल करुन केवळ अशा शेतीविषयक आस्थापना, दुकाने, कृषी उत्पन्न बाजर समित्या व त्यांच्याशी निगडीत पुरवठा व वाहतूक ज्यांना यापुर्वीच्या आदेशान्वये चालू ठेवण्यास मुभा दिली आहे. त्यांना आता सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालू ठेवण्याची मुभा वेळोवेळी निर्गमीत आदेशात नमूद अटी व शर्तीच्या अधिन राहून जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन यांनी दिली आहे.  

आदेश मानला नाही तर होणार कारवाइ

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांना साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि भारतीय दंड संहिता १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. तसेच यापूर्वी जिल्हादंडाधिकारी नांदेड कार्यालयाने निर्गमित केलेले ता. १३, ता. १५, ता. १९ व ता. २१ एप्रिल वर नमूद आदेश व ता. २० एप्रिल रोजी नमूद शुद्धीपत्रकाद्वारे शेती विषयक आस्थापना, दुकाने वगळून इतरांसाठी दिलेले वेळेचे बंधन इत्यादी यापुर्वी प्रमाणेच अंमलात राहील, असे शुद्धीपत्रक जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन यांनी ता. २३ एप्रिल रोजी निर्गमित केले आहे. 

लाॅयन्सचा डबा पोंहचणाऱ्यांना संरक्षक कीट
मागील एक महिन्यापासुन लॉयन्सचा डबा चार स्वयंसेवक शहरातील विविध भागात राहत असलेल्या विद्यार्थ्यांना घरपोंच पुरवठा करतात. नांदेड जिल्हा ग्रीन झोन मधून ऑरेंज झोनमध्ये आल्यामुळे सर्व स्वयंसेवक चिंतेत होते. ही बाब दिलीप ठाकूर यांनी वसीमभाईं यांना सांगितल्यानंतर त्यांनी स्वयंसेवकासाठी पाच संरक्षक किट आणि पाच राशन किट दिले आहेत.

डब्यांसाठी दात्यांचा प्रतिसाद
लॉयन्सच्या डब्यासाठी मदत करण्याचे आवाहन वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्यानंतर अन्नदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. नवीन नोंदणी केल्यामध्ये वर्षा विजयकुमार धारासूरकर यांनी १५० डबे तसेच एन.डी. पवार गोळेगावकर, सेवानिवृत्त न्यायाधीश विजय कुलकर्णी, डॉ. प्रकाश विनायक डोईफोडे, ऋजीत पुराणिक यांनी प्रत्येकी शंभर डबे, या शिवाय डॉ. राजेश चव्हाण, एल. एस. कुलकर्णी, सुनंदा पद्माकर कोडगिरे पुणे, समर सोमनाथ राजपूत कोपरगाव, परमानंद तोष्णीवाल, सुनिता  परमानंद तोष्णीवाल, सीए भगवानदास भुतडा, विठ्ठल गोविंद कवटेकवार, श्रीमती कमलाबाई शंकरलाल मुंदडा यांनी प्रत्येकी पन्नास डबे दिले आहेत. २९ दिवसाअखेर १७ हजार ८८० 0 डब्यांची नोंदणी झाली आहे. १५ हजार ३७० डबे वितरीत करण्यात आले आहेत. लॉयन्स परिवाराकडे फक्त दोन हजार ५१० डबे शिल्लक असून दानशूर नागरिकांनी ५० ते १०० डबे देऊन सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष लॉ. डॉ. विजय भारतीया, उपाध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल, सचिव लॉ. डॉ. मोहन चव्हाण, कोषाध्यक्ष लॉ. शिवा शिंदे यांनी केले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"आम्हाला, त्याची गरज होती, आम्ही आनंदी..."! पाकड्या अबरारला करारबद्ध करण्याचा SRH कडून बचाव; विसरले, भारताचा केलेला अपमान

LPG Crisis: गॅस टंचाईवर ८० लाख लिटर केरोसीनचा ‘बॅकअप’ प्लॅन तयार, काळाबाजारावर योगींची कारवाई

Pune-Bangalore Highway Accident : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात; शिरोली पुलाजवळ, भरधाव मोटार बॅरिकेड्सला धडकली

Bike Accident: पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Xiaomi 17 Price : भारतात लाँच झाला शाओमी 17 स्मार्टफोन; पाहा किंमत अन् दमदार फीचर्स..

SCROLL FOR NEXT