बांधकाम कामगार.jpg 
मराठवाडा

बांधकाम कामगारांना अखेर दिलासा.....कसा तो वाचा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : सध्या लॉकडाऊची परिस्थिती लक्षात घेता मंडळाकडील नोंदणीकृत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना प्रत्येकी दोन हजार रुपये इतके अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटीद्वारे जमा करण्यास शासनाने ता. १८ एप्रिल रोजी मंजुरी दिली आहे. या बाबत बांधकाम कामगारांनी कोणत्याही दलालाच्या भुलथापांना बळी पडू नये, सामाजिक अंतर ठेवावे, कोठेही गर्दी करु नये व जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नांदेडचे सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन अन्वर सय्यद यांनी केले आहे.

नोंदणीकृत मजूरांना मिळणार लाभ
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊन कालावधीत इमारत व इतर बांधकाम बंद झाले आहेत. राज्यातील इमारत व इतर बांधकामांवर काम करणाऱ्या नोंदणीकृत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांनी सध्या कोणतेही कामकाज करता येत नाही. त्यामुळे या सर्व नोंदणीकृत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना बांधकामाच्या ठिकाणी अथवा त्यांच्या घरी थांबावे लागत आहे. त्यांना दररोजची रोजंदारी मिळत नाही. यामुळे त्यांना दैनंदिन गरजांची तजवीज करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्याची लॉकडाऊची परिस्थिती लक्षात घेता मंडळाकडील नोंदणीकृत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना प्रत्येकी दोन हजार रुपये इतके अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटीद्वारे जमा करण्यास शासनाने ता. १८ एप्रिल २०२० रोजी मंजुरी दिली आहे.

दलालाच्या भुलथापांना बळी पडू नये 
नांदेड जिल्ह्यातील काही दलाल सक्रिय झाले असून घरोघरी जाऊन कामगारांना सांगत आहेत की, तुमचे पैसे येणार असून तुम्ही यासाठी पाचशे रुपये आम्हाला द्या व तुमचे कागदपत्रे द्या असे बोलून ठगत आहे. असे कोणी कामगारांस ठगत असेल तर त्याची तक्रार आपल्या जवळील पोलीस ठाणे येथे बांधकाम कामगारांनी करावी. सध्या देशात ता. तीन मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला असून संबंधीत नोंदणीकृत सक्रिय (जिवीत) कामागरांच्या खात्यावर डीबीटीद्वारे, रास्त कामगारांच्या खात्यावर महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ, मुख्यालयातून टाकण्यात येणार आहेत.

गर्दी न करता पैसे उचलावे 
बांधकाम कामगारांनी दलालाच्या भुलथापांना बळी पडू नये व सामाजिक अंतराचे तंतोतंत पालन करुन कोठेही गर्दी करु नये व प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन अन्वर सय्यद यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी! भिवंडीत १० किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा, १५ मिनिटांच्या प्रवासाला तब्बल ३ तास

Asian Games 2026: भारताविरुद्धच्या फायनलमध्ये इराणच्या खेळाडूंचे वागणे संशयास्पद; चौकशी झाली तर अधिकाऱ्यांसह सारेच अडकणार, नेमकं काय झालंय?

MGNREGA History : मागेल त्याला काम ते सांगलीच्या सुपुत्राची दूरदृष्टी; एसटीच्या 15 पैशांच्या अधिभारातून कशी उभी राहिली देशाची 'रोजगार हमी योजना'? एका पत्राने बदलला महाराष्ट्राचा इतिहास

Latest Marathi News Live Update : मुंबई-नाशिक महामार्गावर ५ ते ६ किमी वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Adul Ganesh Mandal: डिजेचा खर्च टाळून गणेश मंडळाची शाळेला ५० हजारांची मदत

SCROLL FOR NEXT