ajit pawar ajit pawar
मराठवाडा

कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

सकाळ डिजिटल टीम

बीडचा पीकविमा पॅटर्नबाबत एवढ चांगल बोलल गेलं, की पंतप्रधानांच्या कडे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टामंडळ नेले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितल की हा पॅटर्न पूर्ण राज्यात लागू करा. हा अतिशय चांगला पॅटर्न.

बीड : कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy Chief Ajit Pawar यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. बीड Beed जिल्ह्याच्या आढावा घेण्यासाठी श्री.पवार बीडमध्ये शुक्रवारी (ता.१८) आले होते. दरम्यान आढावा बैठकीनंत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. श्री. पवार म्हणाले, की यंदा कधी नव्हे तो बीड जिल्ह्यात चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना वाफशावर बी-बियाणे हवे आहेत. म्हणजे खत पाहिजे, पिककर्ज मिळते का नाही? त्याच्यामध्ये काही अडचण आहे, या सर्वांचा आढावा घेण्याकरिता आणि कोरोनाचा सावट आहे. कोरोनाची Corona पहिली लाट आली. आता दुसरी लाट सुरु आहे. तिसरी लाट येऊ पाहतेय असा काहींचा अंदाज आहे. त्यावेळेस तिसऱ्या लाटेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीकोनातून आणि आता पण जे पाॅझिटिव्हिटीचे प्रमाण आहे, हे पूर्ण आटोक्यात आणण्याकरिता विभागीय आयुक्त आणि बाकीचे प्रशासनातील अधिकाऱ्यांबरोबर आमची बैठक झाली, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. Contractual Workers Attempted To Stop Ajit Pawar's Squad In Beed News

भरतीची परवानगी

श्री.पवार म्हणाले, की वैद्यकीय विभाग, ग्रामविकास आणि पोलिस विभाग यांना पूर्ण भरतीची परवानगी दिलेली आहे. त्याची भरतीही सुरु झाली आहे. बीडचा पीकविमा पॅटर्नबाबत Beed Pattern एवढ चांगल बोलल गेलं, की पंतप्रधानांच्या कडे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टामंडळ नेले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितल की हा पॅटर्न पूर्ण राज्यात लागू करा. हा अतिशय चांगला पॅटर्न. हा पॅटर्न पूर्ण राज्यात लागू करण्याचा प्रयत्न झाला. पण तो यंदा लागू होऊ शकणार नाही. तो फक्त बीडपुरता मर्यादित राहणार आहे. पुढच्या वर्षी प्रयत्न करु, अशा प्रकारचा सूतोवाच झाला. पीकविम्याच्या बाबतीत वेगवेगळे प्रवाह आहे. काही राज्यांनी तर ती बंदच करुन टाकली आहे. आम्ही जेवढे पैसे भरतो, विशेषतः शेतकरी, राज्य व केंद्र सरकार मिळून तेवढे पैसे मिळत नाही. पीकविमा कंपन्यांचाच फायदा होऊन जातो. गुजरात सरकारने Gujrat Government देखील तेथील पिकविमा बंद केला. देशातील इतर राज्यातही बंद झाला आहे. आपल्या महाराष्ट्र पुरत बोलायच झाल तर परवा मी आणि राजेश टोपे Rajesh Tope कोल्हापुरात होतो. तेथे पिकविमा उतरण्याचे प्रमाण अवघे ३ ते चार टक्के आहे. अर्थात तो ऐच्छिक आहे. एकीकडे बीडचा पिकविमा पॅटर्न चांगला आहे, शेतकऱ्यांसाठी चांगला आहे, असं कृषी विभाग सांगतो. दुसरीकडे फिल्डवर गेल्यावर दुसर ऐकायला मिळते, याची शहानिशा केली जाईल, असे श्री.पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT