Pankaja Munde  sakal
मराठवाडा

Pankaja Munde : मुंडेंवर वादग्रस्त पोस्ट ; तरुणावर गुन्हा दाखल

माजी मंत्री, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने बुधवारी (ता. ५) शिरापूर गावात तणाव निर्माण झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ मुंडे समर्थकांनी शुक्रवारी (ता. ७) पाथर्डी बंदची हाक दिली आहे. दरम्यान तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी : माजी मंत्री, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने बुधवारी (ता. ५) शिरापूर गावात तणाव निर्माण झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ मुंडे समर्थकांनी शुक्रवारी (ता. ७) पाथर्डी बंदची हाक दिली आहे. दरम्यान तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरापूर येथील एका तरुणाने मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकली. त्यामुळे संतप्त झालेले शेकडो युवक काल रात्री पोलिस स्टेशनला जमा झाले. वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्याकडे केली. यावेळी काही काळ पोलिस स्टेशनला तणाव निर्माण झाला होता.

मुटकुळे यांनी युवकांना शांत करत या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. याप्रकरणी कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. या घटनेच्या निषेधार्थ आज अमोल गर्जे, मुकुंद गर्जे, रणजित बेळगे, अर्जुन धायतडक, अक्षय शिरसाट, ॲड. विठ्ठल बडे, भाऊसाहेब शिरसाट, संदीप आव्हाड, संजय शिरसाट, अशोक दहिफळे, सचिन शिरसाट, कानिफ आंधळे, दत्ता गिते, जनार्धन शिरसाट आदी युवक मोर्चाने पोलिस स्टेशनला गेले. निवेदन देत या घटनेच्या निषेधार्थ पाथर्डी बंदची हाक दिली.

बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सकल ओबीसी समाज, सकल वंजारी समाज, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, लोकनेता महोत्सव समिती व दैवत फाउंडेशन यांनी केले आहे. दरम्यान, याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT