BSF Convocation Ceremony sakal
मराठवाडा

BSF Convocation Ceremony : बीएसएफच्या प्रशिक्षण केंद्रात ३५८ जवानांचा दिक्षांत समारंभ संपन्न

सीमा सुरक्षा दलाच्या सहाय्यक प्रशिक्षण केंद्रात हरियाणा, राजस्थान, बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश, आंध्र प्रदेश, ओरिसा, मणिपूर, पंजाब राज्यातील ३५८ जवानांना खडतर प्रशिक्षण देण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

चाकूर - देशातील विविध राज्यातून देशसेवत दाखल होण्यासाठी ४४ आठवड्याचे खडतर प्रशिक्षण घेतलेल्या ३५८ जवानांचा दिक्षांत समारंभ येथील सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रात महानिरीक्षक विनीत कुमार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता.११) सकाळी संपन्न झाला.

येथील सीमा सुरक्षा दलाच्या सहाय्यक प्रशिक्षण केंद्रात हरियाणा, राजस्थान, बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश, आंध्र प्रदेश, ओरिसा, मणिपूर, पंजाब राज्यातील ३५८ जवानांना खडतर प्रशिक्षण देण्यात आले. जवानांना शारीरिक क्षमता, शस्त्रे, दारुगोळा, फील्ड क्राफ्ट, नकाशा वाचन आणि फील्ड इंजिनीअरिंगचे तसेच अंतर्गत सुरक्षा कर्तव्य, सीमा व्यवस्थापन, कायदा आणि मानवाधिकार या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

४४ आठवड्याचा प्रशिक्षण कालावधी पुर्ण झाल्यामुळे जवानांना पद व गोपनियतीचे शपथ देण्यात आली. सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक विनीत कुमार, कमांडट मदनपाल सिंग यांची उपस्थिती होती. प्रशिक्षण कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंकज सैनी, नागेंद्र कुमार यांना सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी महानिरीक्षक विनीत कुमार यांच्या हस्ते सुवर्णपदक बहाल करण्यात आले.

प्रशिक्षणानंतर जवान भारत -

पाकिस्तान किंवा भारत-बांगलादेशच्या विशाल सीमेच्या सुरक्षेसाठी तयार झाले असून हे सैनिक भारताच्या सीमेवरील कठीण प्रसंगांना तोंड देण्यास सक्षम आहेत. त्यांना सीमा सुरक्षा दलात पाठवून आपल्या मुलांना देशसेवेसाठी समर्पित करणाऱ्या त्यांच्या पालकांचे कौतुक करून महानिरीक्षक विनीत कुमार यांनी पालकांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT