संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

केजला भाजपने उमेदवार बदलला तरच सहकार्य 

सकाळ वृत्तसेवा

बीड - कार्यकर्त्यांची ऊर्जा व उत्साह पाहून केज विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा. केज मतदारसंघात भगवा फडकाविण्यास येथील शिवसेना कार्यकर्ता सक्षम असल्याचे प्रतिपादन जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी रविवारी (ता. आठ) केज येथील मेळाव्यात केले.

युती झाली तर शिवसेना कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन केज विधानसभेचा उमेदवार बदलावा, अशी मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पालकमंत्री पंकज मुंडे यांच्याकडे करणार असल्याचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी सांगितले. 

केज तालुका शिवसेनेतर्फे मेळावा घेण्यात आला. सुरवातीला केज शहरात मोटारसायकल फेरी काढण्यात आली. केज व अंबाजोगाई तालुक्‍यांतील पदाधिकारी, शिवसेना कार्यकर्ते, महिलांची उपस्थिती होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाळकृष्ण हंकारे, चर्मकार महासंघाचे राज्य संस्थापक अध्यक्ष व केळगावचे उपसरपंच राधा घुगे, पिंपरी, येवता, विडा, पिंपळगाव, कासारी, युसूफवडगाव व केज शहरातील कामगार युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. युवा सेना तालुकाप्रमुख अरविंद थोरात यांनी सूत्रसंचालन केले. अंबाजोगाई तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे यांनी आभार मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: शुभमन गिलला T20 World Cup संघातून का वगळलं? गौतम गंभीरवर प्रश्नांचा भडीमार अन् मग...

Latest Marathi News Live Update : कोलकाता येथील बांगलादेश उच्चायुक्तालयावर मोर्चा

Crime: सून सासऱ्यासोबत दारू प्यायची; मुलाला राग अनावर झाला, भलताच प्रकार उघडकीस आला, काय घडलं?

निवडणूकांच्या रणधुमाळीत राजकारणावर आधारित ‘आणीबाणी’ आता ओटीटीवर प्रदर्शित; कुठे पाहाल?

Winter Family Vacation Guide: हिवाळ्यात मुलांसोबत ट्रिप प्लॅन करताय? मग आधी 'या' टिप्स नक्की वाचा; एंजॉयमेंट होईल डबल

SCROLL FOR NEXT