file photo 
मराठवाडा

नांदेडला विविध यंत्रणाकडून कोरोनाबाबत समन्वय 

अभय कुळकजाईकर


नांदेड - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील विविध यंत्रणा दक्ष असून अद्यापपर्यंत नांदेड शहर किंवा जिल्ह्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह नाही. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणेतील विविध अधिकारी समन्वय ठेवून कोरोना प्रतिबंध, नियंत्रण व उपचारात्मक आरोग्य सेवेत नियमित दक्षता घेत आहेत.

नांदेड शहर आणि जिल्ह्यात करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. डॉक्टर, नर्स व आरोग्य कर्मचारी नियमित आरोग्य सेवा देत आहेत. हे सर्व फ्रंटलाईन वॉरियर्स असून त्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्ती यांच्या भूमिका कोरोनाच्या लढयात एका योध्यासम असल्याचा उल्लेख देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

आजाराबाबत जनजागृती
जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन हे सर्व डॉक्टर असल्यामुळे नांदेड जिल्ह्यात सुरुवाती पासून जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सतर्क करुन नांदेड जिल्ह्यात आरोग्य उपचारांसह आवश्यक माहिती देऊन नागरीकांमध्ये या आजाराबाबत जनजागृती केली जात आहे.

 

गावनिहाय समित्या गठीत
जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था या अनुषंगाने सतर्क असून, आरोग्य संस्थेत मुबलक औषधीसाठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याअनुषंगाने आरोग्य यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील होम क्वारंटाईन यांना एकाचवेळी बल्क एसएमएसद्वारे माहिती दिली जात आहे. होम क्वारंटाईन व्यक्तींना आरोग्य कर्मचारी दररोज प्रत्यक्ष भेटीद्वारे विचारपूस करुन उपचार करीत आहेत. त्यांचे मनोबल वाढवित आहेत. काही तीव्र लक्षणे आढळून आल्यास तत्काळ वरिष्ठ आरोग्य संस्थेत पुढील तपासणी, उपचारासाठी पाठविण्यात येत आहे. जिल्ह्यात गावनिहाय समित्या गठीत केल्या असून त्याचबरोबर आरोग्य विभागाने गावनिहाय मायक्रोप्लॉन तयार करुन घेतला आहे.

नियमित आरोग्य तपासणी
नांदेड जिल्हयात इतर जिल्ह्यातून, राज्यातून पायी आलेले मजूर व लॉकडाउनमुळे अडकलेल्या वर्गासाठी लेबर कॅम्प (शरणार्थी शिबीरे) किनवट - दोन, मुखेड - एक, देगलूर - एक, लोहा - एक, हदगाव - एक व कंधार येथे ठेवलेले असून त्यांची नियमित आरोग्य तपासणी व योगा, मेडीटेशन, समुपदेशन दररोज व आवश्‍यकतेप्रमाणे केले जात आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी दिली आहे.

६३ हजार ५२४ व्यक्ती होम क्वारंटाईन
जिल्ह्यात कोविड - १९ आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सतत सर्वेक्षण केले जात आहे. नांदेड जिल्हयात शुक्रवारपर्यंत (ता. तीन) ३९८ संशयीत रुग्ण आढळले असून एकाही रुग्णास कोविड -१९ प्रादुर्भाव झाला नसल्याचे आरोग्य यंत्रणेने कळविले आहे. अन्य देश, इतर जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्यात आलेल्या ६३ हजार ५२४ व्यक्तींना आजपर्यंत होम क्वारंटाईन करण्यात आले असून पुनर्भेटीद्वारे त्यांची आरोग्य विषयक माहिती घेण्यात येत आहे. तसेच आवश्यक त्या सूचनाही देण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT