beed beed
मराठवाडा

आजोबांचे वय नव्वदी पार, कोपीत राहूनच कोरोनावर वार

गोपीनाथ येवले यांनी आपण कोरोनाबाधित असल्याची कसलीही धास्ती वाटून घेतली नाही

प्रशांत कोळपकर

डोंगरकिन्ही (बीड): वय ९०, सात तारखेला त्यांना ताप आला. आठ मे रोजी रॅपीड ॲन्टीजेन तपासणी (covid 19 antigen test) केली असता ते पॉझिटिव्ह आले. आजोबांनी यापूर्वी कधीच दवाखाना पाहिला नव्हता. त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बीडच्या जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र ते गेले नाहीत. त्यांचे एकच म्हणणे, मला येथेच गोळ्या द्या मी बरा होतो. तुम्हाला घरी राहता येणार नाही. तुमच्यामुळे इतरांनाही संसर्ग (corona infection) होऊ शकतो म्हटल्यावर त्यांनी शेतातच निवारा केला आणि तेथे उपचार घेतले. यातून बरेही झाले. गोपीनाथ बापू येवले असे या आजोबांचे नाव आहे.

गोपीनाथ येवले यांनी आपण कोरोनाबाधित असल्याची कसलीही धास्ती वाटून घेतली नाही. आपल्यामुळे घरातील व गावातील इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून त्यांनी शेतातच खोपा बांधला. घरून येणारा दोन वेळेचा जेवणाचा डबा, नाष्टा व प्राथमिक आरोग्य केंद्रातील गोळ्या या व्यतिरिक्त कोणत्याही दुसऱ्या उपचार पद्धतीशिवाय ते कोरोनातून बरे झाले. विशेष म्हणजे ते शाकाहारी आहेत. यामुळे ताज्या पालेभाज्या, दाळी असा प्रोटीनयुक्त आहार डॉक्टरच्या सल्ल्याने त्यांना देण्यात आला.

कोरोनाची तुम्हाला भिती वाटली नाही का? असे विचारले असता त्यांनी मला ताप तर आला होता. कोरोना काय असतो ते माहीत नाही असे उत्तर दिले. त्यांनी बीडला जाण्यासाठी नकार दिला असला तरी मुलगा रघुनाथ येवले, वैद्यकीय अधिकारी व डोंगरकिन्ही येथील कोरोना केअर सेंटरचे कर्मचारी सतत त्यांच्या तब्येतीकडे लक्ष देत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Updates : पुण्याच्या गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित

Heart Health: अतिरिक्त मीठ सेवनाने विकारांचा वाढता धोका; उच्च रक्तदाब, हृदयरोग, मूत्रपिंड विकारांची जोखीम

Marathwada Rain: मराठवाड्यात घटले पावसाचे दिवस; गेल्यावर्षी २९, यंदा सोळाच दिवस

पत्नी प्रियकरासोबत पळून जायची, घटस्फोट मिळताच तरुणानं केली दुधानं अंघोळ; म्हणाला, मी स्वतंत्र झालो, VIDEO VIRAL

Avinash Sable: शर्यतीदरम्यान घसरून पडला साबळे; प्रशिक्षक म्हणाले, काळजीचं कारण नाही अविनाश तंदुरुस्तच

SCROLL FOR NEXT