Nomadic Tribe, Chakur 
मराठवाडा

भटक्यांची व्यथा ः साहेब हातावरच पोट आमचं, गावागावांत फिरलो तरच पोट भरतंय

अशोक बिराजदार

नळेगाव (जि.लातूर) ः आमासनी ना शेतीवाडी काईच न्हाय... गावोगावी जाऊन लोकांची भविष्य सांगून लोक देतील त्यावरच कुटुंबाची पोटाची खळगी भरताव... साहेब हातावरच पोट आमचं... गावागावांत फिरलो तरच पोट भरतंय... पण, ह्यो कोरोना आम्हाला उपाशीच मारत हाय बघा... आपल्या कुटुंबातील सदस्यांकडे पाहत दत्ता चव्हाण हे डोळ्यांत पाणी आणून आपली व्यथा सांगत होते. ते कुटुंबीयांसह नळेगाव (ता.चाकूर) येथे आले आहेत.


कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात टाळेबंदी करण्यात आली आहे. या टाळेबंदीचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. यामध्ये भटक्या जमातीच्या भिक्षा मागणाऱ्या लोकांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना भिक्षा मागून आपली पोटाची भूक भागविण्यासाठी फिरणाऱ्या या लोकांना टाळेबंदीमुळे बाहेर फिरता येत नाही.या भटक्या लोकांचे मूळगाव इकलासपूरवाडी (ता. भालकी, जि. बिदर) आहे. हे चार कुटुंबे आहेत. यामध्ये लहान-मोठी एकूण २० माणसं आहेत. पाल ठोकून उघड्यावर गावाच्या बाहेर हे राहतात. यांच्याकडे रेशनकार्ड नाही, शासनदरबारी यांची कुठेही नोंद नाही. हे गावोगावी भिक्षा मागून आपले पोट भरतात. यांच्याकडे एक गाय आहे.

या गायीला घेऊन गावामध्ये लोकांचे भविष्य सांगून मिळेल त्यामध्ये ते आपले पोट भरतात. सर्वत्र बंद असल्यामुळे यांना गावात कोणी फिरू देत नाही. दररोज भिक्षा मागून भूक भागवायची. आता झोपडीत काय शिल्लक नाही. दोन-दोन दिवस चूल पेटत नाही. शिळंपाकं खाऊन बसावे लागते आहे. लहान-लहान लेकरं आहेत. आवं आम्ही मोठी माणसं कसंतरी पोट मारून उपाशी राहू हो; पण या लहानग्या लेकरांच्या पोटाचं कसं हो... त्या बिचाऱ्याला काय माहीत हो हे सारं... आम्ही मोठी माणसं अर्ध्यापोटी राहून त्यांना जेऊ घालत हाव बघा... अजून किती दिस असं काढावं लागल काहीच कळत न्हाय बघा आता... असली उपासमार आजपर्यंत आम्ही बघितली नव्हती साहेब... बोलता-बोलता अंकुश शितोळे हे थांबले, त्यांना पुढे शब्दच सुचत नव्हते. पाणावलेल्या डोळ्यांत पुढील दिवसाची चिंता स्पष्ट दिसत होती.

मदतीसाठी हात पुढे यावेत
आज समाजात गरजूंकरिता अनेक समाजातील दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत. अशीच मदतीची या कुटुंबांना आवश्यकता आहे. टाळेबंदी उठेपर्यंत त्यांना किट मिळाले तर नक्कीच या कुटुंबांची उपासमार थांबेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT