corona 
मराठवाडा

Corona Breaking  ; जिल्ह्याने ओलांडला दोन हजाराचा आकडा, रविवारी दोन मृत्यू तर ३५ बाधित 

गणेश पांडे

परभणी ः जिल्ह्यातील दोघांचा रविवारी (ता.२३) उपचारादरम्यान मृत्यू झाला तर ३५ जण बाधित झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. एकूण बाधितांचा जिल्ह्याचा आकडा दोन हजार पार झाला आहे. मृतांमध्ये परभणी शहरातील वसमत रोडवरील ७९ वर्षीय पुरुष, गंगाखेड तालुक्यातील मरगळवाडी येथील ६३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 

शहरातील व्यापारी, विक्रेते यांनी येत्या दोन दिवसांत स्वतःच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट करून घ्याव्यात अन्यथा ता. २५ ऑगस्टपासून दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा इशारा महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी दिला आहे. महापालिकेने ता. २८ जुलैपासून शहरातील सर्वप्रकारचे विक्रेते व व्यापारी तसेच त्यांच्या प्रतिष्ठानांवरील नोकर, कर्मचाऱ्यांसाठी रॅपिड टेस्ट सुरू केल्या आहेत. तेव्हा ता. १५ ऑगस्टची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ता. १७ व २४ ऑगस्टपर्यंत व आता २५ ऑगस्ट रॅपिड टेस्ट करण्यासाठी अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. 

परभणीत पत्रकारांसाठी आज अँटीजेन टेस्ट 
परभणी : शहरातील पत्रकारांनीही कोरोना योद्धा म्हणून भूमिका बजावली आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे सोमवारी (ता.२४) औषधी भवनात शहरातील सर्व पत्रकार, छायाचित्रकारांसाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट होणार आहे. मास्कचेही वितरण होईल. संबंधितांनी टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन अशोक रसाळ, प्रा. जयंत बोबडे, अच्युत रसाळ, ज्ञानेश्वर रसाळ यांनी केले आहे. 

आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी पॉझिटिव्ह 
चारठाणा ः चारठाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांची रॅपिड चाचणी करण्यात आली. याचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याने सरपंच बी. जी. चव्हाण यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला सील केले. प्राथमिक आरोग्य केंद्र पुढील तीन दिवस बंद राहणार असल्याचे सांगितले. ग्रामपंचायतकडून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. आरोग्य केंद्राची समता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत यांनी पाहणी करून संपर्कातील कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन राहण्यास सांगितले. तसेच चारठाणा पेठ विभागातील चाळीस वर्षीय महिला जालना येथे पॉझिटिव्ह आली असून जालना येथील संजीवनी दवाखान्यात उपचार घेत असून त्या महिलेच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले. त्या महिलेच्या घराचेही ग्रामपंचायतकडून निर्जंतुकीकरण करण्यात आले. त्या महिलेच्या घराला सरपंच बी. जी. चव्हाण, डी. डी. बुकर, पवन राऊत, गुरुप्रसाद तमशेटे व कर्मचारी उपस्थित होते.

रविवार रात्री साडेसातपर्यंतची आकडेवारी 
परभणी जिल्हा 
एकूण बाधित - दोन हजार ११ 
आजचे बाधित - ३५ 
आजचे मृत्यु - दोन 
एकूण बरे - ७९८ 
उपचार सुरु असलेले - एक हजार १७ 
एकूण मृत्यु - ९६ 


संपादन ः राजन मंगरुळकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वतः लाटते पोळ्या, मोदकही बनवते, 'या' ठिकाणी आहे मराठी अभिनेत्रीचं हॉटेल; मेन्यू सांगत म्हणाली- गणपतीत...

Ganeshotsav news: चिंचवडगावात गणेशोत्सवाची धामधूम; जिवंत देखावे, ‘स्पेस गॅलेक्सी’ संकल्पनेतून सामाजिक संदेश .

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

SCROLL FOR NEXT