corona 
मराठवाडा

Corona Breaking ; परभणीत मंगळवारी पाच पॉझिटिव्ह  

सकाळ वृत्तसेवा

परभणी ः परभणीकरांनो आता खऱ्या अर्थाने सावधगिरी बाळगण्याची वेळ आली आहे. कारण गेल्या पाच दिवसांपासून शहरात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी (ता.सात) एकाच दिवशी पाच रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणादेखिल खडबडून जागी झाली आहे. विशेष म्हणजे यातील दोन रुग्ण परभणी शहरातील तर अन्य तीन रुग्ण सेलू शहर व तालुक्यातील आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या आठवडाभरापासून दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. मंगळवारी (ता.सात) सायंकाळी कोरोनाबाधित एकूण पाच रूग्ण आढळून आले आहेत. त्यात परभणी शहरातील गंगापूत्र कॉलनी भागातील एक महिला (वय ४५), तर गुलाम अली नगर एक महिला (वय ६०) यांचा समावेश आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातून नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या प्रयोगशाळेस संशयितांचे स्वॅब पाठविण्यात आले होते. मंगळवारी प्रयोग शाळेत एकूण ९५ स्वॅब पाठविले होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ई-मेलद्वारे त्या स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले आहे. यात पाच रुग्णांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या १५४ एवढी झाली आहे. आतापर्यंत एकूण चार मृत्यू झाले आहेत.


चार रुग्ण कोरोनामुक्त 
मंगळवारी जिल्हा रुग्णालयातून चार रुग्णांना कोणतीही लक्षणे आढळून आली नसल्याने घरी पाठविण्यात आले आहेत. यामध्ये परभणी शहरातील दोनजण (एक स्त्री, एक पुरुष), जिंतूर एक पुरुष, सोनपेठ एक स्त्रीचा समावेश आहे. 

परभणीत तपासणीसाठी नाक्यांवर पथके तैनात 
परभणी : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या दृष्टीने शहरात बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी स्वतः होम क्वारंटाइन व्हावे अन्यथा गुन्हा दाखल करू, असा इशारा महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी दिला आहे. तसेच तपासणीसाठी नाक्यांवर पथके तैनात करण्यात आली आहेत. राज्यात तसेच शहरात टाळेबंदी झाल्यानंतर अनधिकृतपणे येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी होती. या मार्गाने आलेल्या अनेक नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्या व्यक्तींमुळे त्यांच्या कुटुंबातील तसेच संपर्कातील अनेक जण संक्रमित झाले आहेत. या व्यक्तींना प्रतिबंध करण्याची गरज होती, त्यावेळेस मात्र ते करण्यात फारसे स्वारस्य यंत्रणेने दाखवले नव्हते. परंतु आता कोरोना समाजामध्ये संक्रमित होत असून दररोज कोरोना संक्रमित रुग्ण आढळून येत आहेत. प्रशासनाला वारंवार संचारबंदी लावावी लागत असून प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ होत आहे. 


परभणी जिल्हा 
एकूण पॉझिटिव्ह - १५४ 
आज निघालेले पॉधिटिव्ह - पाच 
उपचार घेत घरी परतलेले - १०२ 
उपचार सुरु - ४८ 
मृत्यू - चार 
----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT