corona
corona 
मराठवाडा

Corona Breaking ; हिंगोलीत एकाचा मृत्यु तर अठरा पॉझिटिव्ह

राजेश दारव्हेकर

हिंगोली ः जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात येणाऱ्या असोला येथील ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे रविवारी (ता.२३) मृत्यु झाला तर नव्याने अठरा रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीवास यांनी दिली. 

अठरा रुग्ण रॅपिड अँन्टीजन टेस्टद्वारे आढळून आले. तर ७७ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यात एकुण एक हजार ३१३ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी एक हजार ९३ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. आजघडीला एकूण २०४ रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि सोळा रुग्णांचा आतापर्यंत मृत्यु झाला. 

सेनगाव नगरपंचायतीचे कामकाज बंद 
सेनगाव शहरातील नगरपंचायतीचे स्वच्छता निरीक्षक यांना कोरोनाची लागण झाल्याने ते बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नगरपंचायत कर्मचाऱ्यांना व १९ नागरिकांना संस्थामक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याने सेनगाव नगरपंचायतीमधील कामकाज हे काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. सोमवारी अंतर्गत कार्यालयीन कामकाजासाठी सुरू असून शहरातील नागरिकांना आपल्या समस्या व इतर बाबींसाठी ई-मेल किंवा व्हॉट्सॲपचा वापर करण्याचे आवाहन नगरपंचायत मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी केले आहे. 
सेनगाव शहरात एका पोलिस उपनिरीक्षकास नुकतीच कोरोनाची लागण झाल्याने सेनगाव पोलिस स्टेशनचे कामकाज काही दिवसांसाठी बंद ठेवले होते. आता पुन्हा स्वच्छता कर्मचारी व स्वच्छता निरीक्षक यांची शनिवारी (ता. २२) कोरोना तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान एक स्वच्छता निरीक्षक यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या बाधित कर्मचाऱ्यास तातडीने कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले. त्याच्या संपर्कात आलेल्या १९ कर्मचारी व नागरिकांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले व नगरपंचायत कार्यालय व परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला. शहरातील नागरिकांना काही अत्यावश्यक बाबी व विकासात्मक समस्यांसाठी नगरपंचायतीच्या ई-मेलवर पत्रव्यवहार करण्याचे आवाहन नगरपंचायत प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 


सेनगावचे पोलिस ठाणे आजपासून सुरू 
हिंगोली: सेनगाव पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यामुळे पोलिस ठाणेदेखील बंद करून सेनगाव हद्दीतील कारभार नर्सी पोलिस ठाण्याकडे सोपवण्यात आला होता; परंतु आता सेनगाव पोलिस ठाणे सुरू करून या ठाण्यातील कारभार इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे देण्यात आला आहे.विशेष म्हणजे सेनगाव पोलिस ठाण्यातील एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने गुरुवारी (ता. २०) या पोलिस ठाण्याला टाळे लावले होते. त्यामुळे या ठाण्यातील सर्व कामकाज नर्सी पोलिस ठाण्याअंतर्गत सुरू होते. सेनगाव पोलिस ठाण्यातील तीन अधिकारी आणि २० कर्मचाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सेनगाव येथील जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाइन करण्यात आले आहे. येथे सर्व पोलिस सोशल डिस्टन्सिंग पाळत पिटी योगासने करीत आहेत. शिवाय गणेशोत्सव, मोहरम आल्याने आजपासून सेनगाव पोलिस ठाण्यात इतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना तात्पुरता चार्ज देऊन पोलिस ठाणे सुरू केले आहे. पोलिस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांच्याकडे सेनगाव पोलिस ठाण्याचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे. 

रविवार रात्री साडेसातपर्यंतची आकडेवारी 

हिंगोली जिल्हा 
एकूण बाधित - एक हजार ३१३ 
आजचे बाधित - १८ 
आजचे मृत्यु - एक 
एकूण बरे - एक हजार ९३ 
उपचार सुरु असलेले - २०४ 
एकूण मृत्यु - १६ 

संपादन ः राजन मंगरुळकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT