mukhed.jpg 
मराठवाडा

‘कोरोना’ कक्षास जिल्हाधिकारी डाॅ. इटनकर यांची भेट

सुनिल पौळकर


मुखेड, (जि.नांदेड) ः येथील उपजिल्हा रूग्णालयातील शंभर खाटाच्या दवाखान्यात नुकतेच निर्माण करण्यात आलेले ५० खाटांचे काेव्हीड-१९ कक्षाची पाहणी करण्यासाठी शनिवारी (ता.चार) जिल्हाधिकारी डाॅ. बिपीन इटनकर यांनी भेट दिली. या वेळी व्हेंटीलेटर सह इतर यंत्रणा खरेदीसाठी आमदार डाॅ. तुषार राठाेड यांनी २५ लक्ष व आपत्ती व्यवस्थापन व जिल्हा नियाेजन समितीचे ५० लक्ष असे एकूण ७५ लक्ष रूपयांच्या निधीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे साेपवले.

सर्वांनी सहकार्य करावे
दिवसेंदिवस काेराेना या महामारीच्या विषाणूची लागन झालेल्या रूग्णांची संख्या वाढत असल्याने तालुक्यात संभाव्य रूग्ण वाढ लक्षात घेता उपजिल्हा रूग्णालयात ५० खाटांचे स्वतंत्र काेव्हीड-१९ रूग्णालय निर्माण करण्यात आले आहे. या कक्षाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले असले तरी या यंत्रणेवर अधिक ताण येणार नाही. यासाठी स्थानिक पातळीवर खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आपली दवाखाने चालु करण्यासंदर्भात संबंधितांना नाेटीसा देण्याच्या सूचना तहसीलदार यांना करण्यात आल्या आहेत. तसेच लाॅकडाऊनच्या परिस्थीत सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. निळकंठ भाेसीकर, तहसीलदार काशीनाथ पाटील, वैद्यकीय अधिक्षक आनंद पाटील, पाेलिस निरीक्षक एन.जी. आकुसकर, डाॅ. संताेष टांकसाळे, डाॅ. रमेश गवाले आदींची उपस्थिती हाेती.  

वैश्विक महामारीत काेराेनाच्या विषाणूने सर्वत्र धुमाकुळ घातला असताना त्याला अटकाव करण्यासाठी व प्रादूर्भाव झाल्यानंतर उपचारासाठी लागणारे व्हेंटीलेटर, दाेन माॅनीटर, बाॅयपॅप, अॅटाेक्लेव्ह, प्लस आॅक्सी मीटर सह साहित्य खरेदी साठी एकूण ७५ लक्ष रूपयांची आवश्यकता आहे. यासाठी स्थानिक विकास निधीतून २५ लक्ष व राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन व जिल्हा नियाेजन समति या निधीतून ५० लक्ष असे एकूण ७५ लक्ष रूपयांच्या निधीचे पत्र जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांच्याकडे सुपूर्द केले असून नागरीकांनीसुद्धा लाॅकडाऊनच्या नियमांचे पालन करून स्वतः व इतरांना या आजारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन आमदार डाॅ. तुषार राठाेड यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT