file photo 
मराठवाडा

विवाहाच्या सर्व मुहूर्तांवर सोडावे लागणार पाणी !

कैलास चव्हाण

परभणी : ‘कोरोना’मुळे सर्व जनजीवन ठप्प झाले असून भविष्यातदेखील किती दिवस लॉकडाऊन राहणार हे निश्चित नसल्याने यंदाच्या हंगामातील विवाहाच्या सर्व मुहूर्तांवर पाणी सोडावे लागण्याची वेळ आली आहे. आता पावसाळ्या आधीच्या  १९ मुहूर्तांचे भवितव्य ‘कोरोना’च्या हाती असणार आहे.

‘कोरोना’ विषाणूमुळे जगभर हाहाकार उडवला आहे. अवघ्या जगाची बाजारपेठ ठप्प झाल्याने सर्वत्र सन्नाटा पसरला आहे. संपूर्ण जगच लॉकडाऊन असल्याने अर्थव्यवस्थेला आतापर्यंतचा सर्वात मोठा फटका बसला आहे. सर्व व्यवहार, धार्मिक, कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामातील लग्न सोहळेदेखील रद्द झाल्यात जमा आहेत. देशात फेब्रुवारीमध्ये आणि महाराष्ट्रात मार्च महिन्यात ‘कोरोना’चा शिरकाव झाल्यानंतर यंदाच्या हंगामातील ता. आठ मार्च रोजीचा मुहूर्त अखेरचा ठरला आहे. त्यानंतर लग्नसोहळ्यावर बंदी घालण्यात आली. लॉन्स, मंगल कार्यालये बंद करण्यात आली. तसेच मंदिरेदेखील बंद झाली. त्यामुळे सर्व सोहळे रद्द झाली आहेत. यंदा एप्रिल महिन्यात सर्वाधिक मुहूर्त आहेत. परंतु, ‘कोरोना’चा कहर पाहता देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यानंतरही लॉकडाऊनची शक्यता असल्याने जवळपास यंदाचे विवाह सोहळे पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नाही. 

अखेरचा मुहूर्त ता.१६ जून
गर्दी टाळणे, संसर्ग थांबविणे हा त्यामागचा उद्देश असल्याने सर्वांनी या संकटाविरुद्धच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी गर्दी करू नका. यंदा ता. एप्रिल महिन्यात ता.१३, १५, १६,२६, २७ या मुहूर्तांच्या तारखा आहेत. ता. २६ एप्रिलपासून वैशाख महिना सुरू होत आहे. मे महिन्यात २, ६, ७, ८, १२, १४, १७, १८, १९ या तारखा असून ता. २४ पासून ज्येष्ठ महिना सुरू होत आहे. ज्येष्ठात ६, १४, १५, १६ या तारखा असून ता. १७ पासून आषाढ महिना सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीचा अखेरचा मुहूर्त ता. १६ जून हा आहे. ‘कोरोना’ची भीती वाढत असल्याने यंदाचे पुढील दोन महिन्यांतील
सर्व सोहळे रद्द झाल्यात जमा आहेत. असे झाले तर दिवाळीनंतरच्या मुहूर्तांकडे लक्ष लागणार आहे.

यांना बसला फटका
विवाह सोहळे नसल्यामुळे अनेक घटकांना त्याचा फटका बसला आहे. मंगल कार्यालय, वाजंत्रीवाले, केटर्स, पत्रिकावाले, फर्निचर दुकानदार, मंडपवाले, सराफा, कापड, छायाचित्रकार आदी घटकांवर परिणाम झाला आहे.

गेटकेनाचा पर्याय
आषाढ लागण्यापूर्वी सर्व काही सुरळीत न झाल्यास आषाढानंतरच्या मुहूर्तावर गेटकेन पद्धतीने विवाहाचा पर्याय नियोजित विवांहाना उरला आहे.

शेवटी जीव महत्त्वाचा
‘कोरोना’ हारवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असून त्यासाठी शासनाने सांगितल्याप्रमाणे वागण्याची गरज आहे. त्यामुळे व्यवहार बंद राहिले तरी हारकत नाही, सोहळे रद्द झाले तरी काही फरक पडणार नाही. कारण प्रत्येकाचे जीव महत्त्वाचे आहेत ही बाब प्रत्येकाने समजून घेण्याची गरज आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking: जर्मनीचा खेळ खल्लास... पॅराग्वेचा पेनल्टी शूट आऊटमध्ये रोमहर्षक विजय, Fifa World Cup स्पर्धेतून माजी विजेते बाहेर

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

SCROLL FOR NEXT