file photo 
मराठवाडा

‘कोरोना’ काही जाईना अन् पाऊस थांबेना !

कैलास चव्हाण

परभणी : कोरोनाच्या संकटामुळे अवघे जग चिंतेत सापडले असताना मराठवाड्यात अवकाळी पाऊस सतत डोकावुन जात आहे. १५ दिवसात दोनदा अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यानंतर आता पुन्हा ता. २८ व ता. २९ रोजी अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.त्यामुळे कोरोना काही जाईन अन अवकाळी पाऊस काही थांबेना अशी म्हणण्याची वेळ आली आहे.


हेही वाचा - शेतकऱ्यांचा ‘मेसेज’ आणि मुख्यमंत्र्यांची तत्परता...!
मागील १५ दिवसांपासून सातत्याने मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडत आहे. उन्हाळ्याचे दिवस असतानाही ढगाळ वातावरण तयार झाले आहे. १० दिवसापूर्वी गारांचा पाऊस झाल्यानंतर बुधवारी (ता.२५) रात्रीच्या वेळी पावसाने दणका दिला. विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले.

शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या

वादळी वाऱ्यामुळे फळबागांना फटका बसला आहे. बुधवारच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीतून सावरण्याआधीच आता पुन्हा पावसाचा तडाखा बसणार आहे. हवामान विभागाने पुन्हा पाऊस येणार असल्याचे जाहीर केल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. ता. २७ आणि २८ रोजी  मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. ता. २९ व ३१ मार्च  मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस होण्याची शक्यता, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ग्रामीण मौसम कृषि सेवा विभागाने दिली आहे.


हेही वाचा - ‘लॉकडाऊन’ने खासगी दवाखाने बंद

अवकाळीचा या पिकांना फटका

सध्या सर्वत्र रब्बी हंगामाची काढणी अंतिम टप्यात आली असताना ‘कोरोना’चे संकट आले आहे. त्याता परिणाम म्हणून समुहाने मजुर काढणीला नेता येत नाहीत. तसेच मजुर देखील यायला तयार नाहीत. त्यात यंत्रचालक देखील काढणीला तयार होत नसल्याने शेतात अजुनही उभी पिके आहेत. त्यामुळे एक-दोन मजुरांच्या सहायाने शेतकरी काढणी करु लागले असताना अवकाळी पाऊसस गोंधळ घालत आहे. आवकाळी पावसामुळे ज्वारी, हरबरा, गहु पिकांना फटका बसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

America-Iran War: होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव! २४ तासांत तीन तेल जहाजांवर हल्ले

SCROLL FOR NEXT