Latur News
Latur News 
मराठवाडा

दिलासादायक : लातूरात सहा वर्षांच्या चिमुकलीसह 18 जणांनी केली काेरोनावर मात

सुशांत सांगवे

लातूर : लातूर शहरात आणि जिल्ह्यात रुग्णसंख्येचा आलेख वाढत असतानाच लातूर शहर आणि जिल्ह्यातील तब्बल १८ कोरोनाबाधित रूग्ण बरे झाल्याने त्यांना गुरूवारी (ता. ४) घरी सोडण्यात आल्याची दिलासादायक माहिती जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे, या १८ जणांमध्ये सहा वर्षाच्या एका चिमुकलीचाही समावेश आहे. तिच्यासह मधुमेहाने त्रस्त असलेल्या लातूरातील एका रुग्णाने कोरोनावर मात केली आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील १८ पैकी 13 रुग्णांची प्रकृती पुर्णपणे बरी झाली असल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. यात 6 ते 65 वर्षे वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहेत. 13 रुग्णांपैकी 9 रुग्णांना निमोनियाची लक्षणे होती व गंभीर स्वरुपाचा आजार होता. यातील एका रुग्णाला ७ दिवस व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. मागील 6 दिवसांपासून या रुग्णांना कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. त्यामुळे आयसीएमआरच्या नवीन मार्गदर्शक सुचनेनुसार त्यांना रूग्णालयातून सोडण्यात आले.

यात शहरातील एमआयडीसी भागातील हडको कॉलनीतील ५, लेबर कॉलनीतील १, लातूर तालूक्यातील बोरगाव काळेमधील २, मसला गावातील १, अहमदपूरमधील १, चाकूरमधील वळवळ नागनाथमधील १, पानगाव (रेणापूर) मधील ०१ आणि मुळचे उस्मानाबादमधील पण लातूरमध्ये उपचार घेत असलेले १ अशा १३ व्यक्तींचा समावेश आहे. त्यातील ७ व्यक्तींना होम क्वारंटाईन ६ व्यक्तींना इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली. दरम्यान, कोरोनातून बरे झाल्याने रुग्णालयातून सोडून देण्यात आलेल्या उर्वरित २ व्यक्ती उदगीरमधील, अहमदपूरातील मांडणी येथील ३ व्यक्तींचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी ‘सकाळ’ला दिली.

हे आहेत कोरोना योद्धा
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकुर, डॉ. मंगेश सेलुकर, डॉ. उमेश लाड, डॉ. संतोषकुमार डोपे, डॉ. निलिमा देशपांडे, डॉ. शिवप्रसाद मुंदडा, डॉ. मारुती कराळे कोरोना यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गजानन हलकंचे, डॉ. राम मुंढे,  डॉ. विनायक सिरसाठ, डॉ. दिपक कोकणे, डॉ. किरण डावळे, डॉ. ऋषिकेश हरिदास, डॉ. राजेश बोबडे, डॉ. प्रविण भगत,  डॉ. शाम तोष्णीवाल, डॉ. निलेश नागरगोजे, डॉ. अभिजित यादव, डॉ. उमेश बिराजदार, डॉ. महादेव बनसुडे, डॉ. गणेश पवार, डॉ. सचिन राठोड, डॉ. रविभूषण कासले, डॉ. कांचन जाधव, डॉ. किशोर जाधव, डॉ. सुमित वाघमारे, डॉ. चेतन आद्रट, डॉ. विनोद खेडकर, डॉ. बालाजी आद्रट,  डॉ. प्रणिता पाटील, डॉ. अनिल बोगुलवार, डॉ. लक्ष्मण सरकुंडे, अमृता पोहरे, डी. व्ही. तेलगांवकर हे प्रयत्न करत आहेत, संस्थेतर्फे सांगण्यात आले.

कोरोना मीटर

  1. एकुण बाधीत : १४२
  2. उपचार सुरू असलेले : ४४
  3. बरे झालेले : ९४
  4. मृत्यू : ०४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT