file photo 
मराठवाडा

‘या’ शहराला ‘कोरोना’ चा आसाही झाला फायदा !

कृष्णा पिंगळे

सोनपेठ (जि.परभणी) : देशभरातील नागरिकांना ‘कोरोना’ रोगाचा फटका बसत असताना सोनपेठकरांना मात्र, बहुप्रतीक्षित ग्रामीण रुग्णालयाचा लाभ आता मिळणार आहे.
‘कोरोना’ संक्रमनामुळे सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयात दहा खाटांचा विलगीकरण कक्ष सुरू करण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांनी जाहीर केले आहे. तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात आरोग्यमंत्री असलेल्या डॉ. प्रा. फौजिया खान यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या सोनपेठ ग्रामीण रुग्णालयाची इमारत बांधून तीन वर्षे उलटली. २०१७ मध्ये पूर्ण झालेल्या या इमारतीच्या संपूर्ण कामानंतर ही ग्रामीण रुग्णालयाची सुरवात झाली नव्हती.

रुग्णवाहिकादेखील डॉक्टरअभावी बंद
सोनपेठ व परिसरातील नव्वद हजारांहून अधिक नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी केवळ एकच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तर अधिकच्या उपचारासाठी नागरिकांना फौजिया खान यांनीच चालू केलेल्या १०८ रुग्णवाहिकेचा आधार घ्यावा लागत होता. ही रुग्णवाहिकादेखील एक महिन्यापासून डॉक्टरअभावी बंद पडली आहे.

हेही वाचा - जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा ३१ मार्चपर्यंत बंद

 विलगिकरन कक्ष स्थापन 
 ‘कोरोना’ रोगाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सजग नागरिकांकडून रुग्णवाहिका तसेच ग्रामीण रुग्णालय चालू करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य प्रशासनाकडे मागणी वारंवार केली जात होती. ‘कोरोना’ रोगाच्या पार्श्वभूमीवर विलगिकरन कक्ष स्थापन करण्याच्या निमित्ताने जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सोनपेठ येथे ग्रामीण रुग्णालयात दहा खाटांचे विलगीकरण कक्ष स्थापन केल्याची माहिती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

हेही वाचा - ‘कोरोना’चा परिणाम : बस, रेल्वेची ओसरली गर्दी !

संपूर्ण सुविधेसह सुरू व्हावे
‘कोरोना’ रोगाच्या निमित्ताने का होईना सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालय सुरू होत आहे. हे रुग्णालय संपूर्णपणे सुरू व्हावे यासाठी या रुग्णालयात आवश्यक ते साहित्य व वैद्यकीय उपकरणे तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्त्या होणे आवश्यक आहे. या कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीचा फायदा घेऊन हे ग्रामीण रुग्णालय संपूर्ण सुविधेसह सुरू व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे. कोरोना व्हायरसच्या निमित्ताने अंशतः का होईना ग्रामीण रुग्णालयाची सुविधा सुरू झाल्याने नागरिक सोनपेठच्या आरोग्य सेवेसाठी अखेर कोरोनाच पावला, असे उपहासाने म्हणत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

SCROLL FOR NEXT