bhum farmer. 
मराठवाडा

Corona Impact| हतबल शेतकऱ्याने पिकात सोडली जनावरे; शेतातच सडतेय फळपीक

अब्बास सय्यद

भूम (जि. उस्मानाबाद): राज्य शासनाच्या कडक निर्बंधामुळे आठवडे बाजार बंद आहेत. परिणामी, शेतमाल शेतातच सडत आहे. यात सर्वाधिक नुकसान भाजीवर्गीय आणि फळपिकांचे होत आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. तालुक्यातील वांगी खुर्द येथील रामचंद्र सांगोळे यांनी दोन एकरात खरबुजाचे उत्पादन घेतले.

आता उन्हाळ्यात बाजारपेठेत खरबुजाची मागणी वाढेल, अशी आशा त्यांना होती. पण, आठवडे बाजारबंद झाल्याने खरबुजाचे भाव गडगडले. त्यामुळे शहरात ते विक्रीसाठी नेले तरी वाहतूक खर्चही निघणे अवघड असल्याने त्यांच्या शेतातील काढणीस आलेले खरबूज जागेवरच वाळत असून, त्यात त्यांनी जनावरांना चरण्यासाठी सोडले. यामुळे त्यांचे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

शिवाय कष्ट वाया गेले ते वेगळेच. श्री. सांगोळे यांचे हे नुकसान केवळ प्रातिनिधिक आहे. अशीच स्थिती इतर शेतकऱ्यांचीही आहे. टरबूज, टोमॅटो आणि इतर फळपीक, भाजीवर्गीय पिकांचे उत्पादकांनी मोठा फटका बसला आहे. गतवर्षीही नुकसान, त्यानंतर झालेली अतिवृष्टी यातून कसेबसे सावरलेल्या शेतकऱ्यांवर आता मोठे आर्थिक संकट आले आहे. 

कडक निर्बंध, वाढलेले इंधनदर यामुळे बाजारपेठे शेतमाल नेणे अवघड झाले आहेत. शेतातच खरबूज वाळत आहे. त्याचा उपयोग सध्या जनावरांच्या चाऱ्यासाठी करत आहे. राहिलेला खरबूज काढून खरिपासाठी शेतीची मशागत करणार आहे. शासनाने नुकसानभरपाई द्यावी. 
- रामचंद्र सांगोळे, शेतकरी वांगी खुर्द 

 

(edited by- pramod sarawale) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT