file photo 
मराठवाडा

जिंतूरात न्यायाधीशांसह खासगी डॉक्टराला कोरोनाची लागण; एकाच दिवशी ३३० व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी

राजाभाऊ नगरकर

जिंतूर (जिल्हा परभणी) : शहरातील महिला न्यायाधीश व एका खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यासह इतर बाराजण कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. 
तर ग्रामीण रुग्णालयात एकाच दिवशी शहरातील तब्बल ३३० व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली असल्याची माहिती स्थानिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आली आहे.

तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढतच असून दुसऱ्या लाटेत कोरोना बाधितांच्या संख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढतच असल्याने शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मागील कांही दिवसांपासून दररोज कोरोना बधितांचा आकडा फूगत आहे. त्यातच ग्रामीण रुग्णालयात अँटीजेंन किटद्वारे घेण्यात आलेल्या पन्नास जणांच्या चाचणीत शहरातील एक महिला न्यायाधीश व एका खाजगी वैद्यकीय अधिकाऱ्यासह इतर बारा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या आदेशान्वये शहरातील तब्बल ३३० व्यापाऱ्यांची आरटीपीसीआरद्वारे चाचणी घेण्यात आली आहे.

ता. २० मार्च रोजी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये जिंतूर न्यायालय परिसरातील ४१ वर्षीय महिला न्यायाधीश यांच्यासह १६ व ७० वर्षीय महिला तसेच गणेशनगरातील ४६ वर्षीय वैद्यकीय अधिकारी, खैरीप्लॉट येथील ६५ वर्षीय एक महिला आणि पुरूष, आमदार कॉलनीमधील ३२ वर्षीय पुरुष व ३२ आणि सहा वर्षीय महिला, शिवाजीनगर येथील ५७ वर्षीय पुरुष, कोमटी गल्ली येथील 32 वर्षीय व ३० वर्षीय पुरुष, आनंदनगर येथील ४५ वर्षीय पुरुष तर ग्रामीण भागातील ३३ वर्षीय पुरुष या रुग्णांचा समावेश आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT