file photo
file photo 
मराठवाडा

Video:कोरोना हरेल...माझा देश जिंकेल...!

गणेश पांडे

परभणी : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे सर्व जग हादरुन गेले आहे. देशात व महाराष्ट्रात विषाणुचा संसर्ग वाढला आहे. या मुळे संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आल्याने याचा विपरित परिणाम देशातील उद्योग धंद्यावर जाणवू लागला आहे. परभणी शहरातील सर्व छोटे मोठे उद्योग बंद आहेत. हातावर पोट असणाऱ्यांच्या दोन वेळ जेवणाचे वांदे होऊन बसले आहेत. परंतू कोरोनाला देशातून हद्दपार करण्यासाठी परभणीकर लढाईला सज्ज झाले आहेत. घरात बसून प्रशासनाच्या नियमाचे देखील पालन केले जात आहे केवळ एका विश्वासासह की, ‘कोरोना हरेल व माझा देश जिंकेल...!

परभणी जिल्हा हा मराठवाड्यातील महत्वाच्या जिल्ह्यापैकी आहे. या जिल्ह्यावर निजाम राजवटीचा पगडा अजूनही दिसून येतो. जुलमी निजामाच्या तावडीतून स्वताची सुटका करून घेण्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्रामात या जिल्ह्याचे योगदान अतुलनिय आहे. म्हणूनच की काय या जिल्ह्यातील सर्व नागरिक कोणत्याही लढाईला सर्वात आधी सज्ज असतात. आता तर माणसावर आलेला हा महाभंयकर रोग नष्ट करण्यासाठी परभणीकरामधील माणुसकीदेखील पहावयास मिळत आहे. कोरोना विषाणुचा संसर्ग झाल्यानंतर देशात लॉकडाऊन सुरु झाले. परभणीकरांनी सुरुवातीपासूनच या लॉकडाऊनला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे.

सुचनाचे काटेकोरपणे पालन  
जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या सुचनाचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याने परभणी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत एकदम शांत दिसत आहे. सकाळी ११ नंतर रस्ते निर्मनुष्य होत आहेत. एकंदरच परभणीकरांची परिस्थितीला लढा देण्याची परंपरा या दिवसातही दिसून येत आहे. कोरोनाला हरवून हद्दपार करण्यासाठी परभणीकरांनी एकजूट दाखविली आहे.
 

१६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्त्या
 कोरोना विषाणुला लढा देण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणादेखील अधिक सक्षम करण्याचे काम सुरु झाले आहे. जिल्ह्यात १६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. तसेच पारिचारिकांची पदे ही कंत्राटीतत्वावर भरण्यात आली आहेत. प्रशासन आपल्या परीने परभणीला कोरोनापासून दुर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. 

१३५ जांचा अहवाल निगेटिव्ह 
सध्या परभणीत कोरोना बाधीत एकही रुग्ण नसला तरी संशयीत रुग्णांची संख्या वाढत जात आहे. हा आकडा आता २५० च्या जवळ पोहचला आहे. यामुळे जिल्हा प्रशासन व जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासन कडक पाऊले उचलतांना दिसत आहेत. ता. तीन मार्चपर्यंत जिल्ह्यातील १८३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी १३५ निगेटिव्ह आले आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT