File Photo 
मराठवाडा

‘कोरोना’चा नांदेड जिल्ह्याला सध्या तरी दिलासा...

शिवचरण वावळे

नांदेड : ‘कोरोना’च्या संसर्गाच्या बाबतीत आजपर्यंत परिस्थिती नियंत्रणात असून जिल्हाभरातुन आत्तापर्यंत कोरोना संशयित व्यक्तींच्या घशातील लाळेचे पाठवण्यात आलेले स्वॅब निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. सध्या शहरातील एकुण ‘क्वारंटाईन’ व्यक्तींची संख्या ४६१ इतकी आहे. तर १४ ते २८ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या १२२ इतकी आहे. असे असले तरी, यातील ३१ संशयित व्यक्तींना श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय, विष्णुपुरीचे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय व शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तर एकास दवाखान्यात एकास क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

सात नमुने तपासणी अहवाल येणे बाकी
सध्या ४६० प्रवाशांना घरीच क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रविवारी (ता.१२) एप्रिलला तीन संशयित व्यक्तींच्या घशातील लाळेचे स्वॅब तपासणीसाठी घेऊन ते औरंगाबाद येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. या शिवाय एकुण १९९ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. यातील १८७ संशयितांच्या स्वॅबचे नमुने निगेटिव्ह आले आहेत आणि सात नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहे. 

मनातील संशय घालवण्यासाठी घेतले नमुने 
‘कोरोना’च्या धास्ती घेतलेल्या व कोरोनाची कुठलेही लक्षणे नसताना देखील पाच व्यक्तींच्या मनातील संशय घालवण्यासाठी त्यांच्या घशातील लाळेचे स्वॅब घेऊन ते औरंगाबादच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र, त्या पाच व्यक्तीस कुठलेही लक्षणे नसताना पाठविलेले पाचही नमुने न तपासता परत पाठविण्यात आल्याचे समजते. जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी ७२ हजार ९८ असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

Palkhed Dam Tricolour Lighting: तिरंग्याच्या रंगात न्हाले धरणः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मनमोहक तिरंगी विद्युत रोषणाई

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

Kamalakar Chaskar Police Medal: चास गावच्या सुपूत्राला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल 15 ऑगस्ट रोजी अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

SCROLL FOR NEXT