lockdown 
मराठवाडा

कोरोनाचा धोका : एक ऑगस्टपासून उस्मानाबादेत राहणार हे सुरु आणि हे बंद..

सयाजी शेळके

उस्मानाबाद : शहरात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाने दुचाकीला बंदी घातली आहे. शनिवारपासून (एक ऑगस्ट) याची अंमलबजावणी होणार आहे. पूर्ण शहरात अत्यावशक सेवा वगळता सर्वच दुचाकींना परवानगी नाकारण्यात आली आहे.

शहरात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकूण कोरोना बाधितांचा आकडा आता दिडशेच्या पुढे सरकत आहे. शहरात यापूर्वीही संचारबंदी लागू केली होती. तरीही शहरातील फैलाव रोखण्यास यश येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे.

शहरातील अंतर्गत वाहुतकीसाठी आवश्यक घटक असलेल्या दुचाकीला बंदी घातली आहे. कोरोनाचा फैलाव रोखताना दुचाकीस्वाराला एकट्याला फिरण्यास परवानगी होती. मात्र काही दुचाकीस्वार दोघे बसून जात असल्याचे निदर्शनास येत होते. अशा दुचाकीस्वारांना दंड आकारण्यात येत आहे. तरीही दुचाकीस्वारांचे शहरात फिरणे थांबत नसल्याचे प्रशासनास दिसून आले आहे. त्यामुळे प्रशासनाने भटकंती करणाऱ्यांच्या विरोधात एक मोहिम हाती घेतली आहे. शहरात दुचाकीवर फिरण्यास बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंढे यांनी आज याबाबात आदेश काढले आहेत. अत्यावश्यक घटक असलेल्यांना मात्र यातून वगळण्यात आले आहे.

शासकीय कार्यालयात कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र यातून वगळण्यात आले आहे. दूध विक्रेत्यांना मात्र दूध विक्रीपुरती परवानगी असणार आहे. दरम्यान ज्यांना दुचाकीवर जाणे आवश्यक आहे, अशा नागरिकांना पालिकेकडून परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. तातडीच्या वैद्यकीय गरजेसाठी मात्र दुचाकी वापरता येणार आहे. दरम्यान शनिवारपासून याची अंमलबजावणी संपू्र्ण शहरात होणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे.


संपादन - सुस्मिता वडतिले    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT