Latur Coronavirus Updates 
मराठवाडा

Breaking News: लातूरमध्ये कोरोनाचा शिरकाव, उदगीरात तीन कोरोनाबाधित

हरि तुगावकर

लातूर ः कोरोनाच्या संदर्भात लातूर आतापर्यंत मुक्त होते. पण आता कोरोनाने शिरकाव केला आहे. माळीनगर भागातील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पण समाधानाची बाब एक आहे की, हा व्यक्ती ठाणे येथून रुग्णवाहिका घेऊन सरळ विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आला होता. तो आपल्या घरी किंवा शहरात फिरलेला नाही. दरम्यान, उदगीरमध्ये आणखी तिघांना कोरोनाची लागण झाली आहे, तर वडवळ नागनाथ व जळकोट येथे एक नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने कोरोना आता ग्रामीण भागात पाय पसरू लागला आहे.


येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत रविवारी (ता. १७) ७८ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ११ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. यात लातूर येथील माळीनगर भागातील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीचा व वडवळ नागनाथ येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते दोघेही मुंबई येथून प्रवास करून आले आहेत. यातील लातूरचा हा व्यक्ती ठाणे येथून रुग्णवाहिका करून सरळ रुग्णालयात आलेला आहे. तो त्याच्या घऱी किंवा परिसरात फिरलेला नाही, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली.


या संस्थेतील व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयातील नऊ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सहा व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून तीन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जळकोट येथील एका व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी आला होता. त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या संस्थेत बीड येथील २९ व उस्मानाबाद येथील २८ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते, अशी माहिती डॉ. ठाकूर यांनी दिली.

तपासणी न करता येणाऱ्यांवर लक्ष ठेवा, लातूरच्या पालकमंत्र्यांच्या प्रशासनाला...

कोरोना मीटर
एकूण बाधित रुग्ण ----५५
उपचार सुरू असलेले---२४
बरे झालेले रुग्ण--२९
मृत्यू---२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT