Health Insurance
Health Insurance  
मराठवाडा

Health Insurance : कोरोना रक्षक पॉलिसीची रक्कम व्याजासहित देण्याचे विमा कंपनीला आदेश

सकाळ डिजिटल टीम

हिंगोली : कोरोना रक्षक पॉलीसी मध्ये पाँलीसी धारकास मानसिक त्रासापोटी दहा हजार व तक्रारीचा खर्च दोन हजार असे एकूण बारा हजार देण्याचे आदेश ग्राहक आयोगाने दिले असल्याची माहिती ऍड. पवनकुमार भन्साळी यांनी दिली.

तक्रारदार डॉ. अष्टशील भिसे यांनी इफको टोकियो जनरल विमा कंपनी मर्यादित यांचे कडून दिनांक २१ सप्टेंबर २०२० ते २ जुलै २०२० या कालावधी करिता दोन लाख ५० हजार रुपयांची कोरोना रक्षक पॉलिसी घेतली होती. ज्यामध्ये तक्रारदार जर कोरोना पॉझीटीव्ह झाले आणि ७२ तास दवाखान्यात भरती झाले तर त्यांना विम्याची संपूर्ण रक्कम देण्यात येइल असे सांगितले होते.

परंतु जेव्हा तक्रारदार यांनी क्लेम दाखल केला तेव्हा विमा कंपनीने तक्रारदार यांचा क्लेम दवाखान्यात भरती होण्याचे काम नव्हते म्हणून जाणून बुजून नाकारला. म्हणून शेवटी ऍड पवनकुमार भन्साळी यांच्या मार्फत हिंगोली जिल्हा ग्राहक आयोगात धाव घेतली यामध्ये विमा कंपनी व कंपनीचे संचालक यांच्या विरुद्ध सदरची तक्रार दाखल केली होती.

यामध्ये कोरोना काळात घरी सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही म्हणून दवाखान्यात उपचार करणे जरुरीचे होते त्यामुळे क्लेम नाकारणे हे अनुचित व्यापार पद्धत आहे असे आयोगाचे मत आहे. तसेच तक्रारदार हे कोरोना पोझीटिव्ह रिपोर्ट नंतर ७ दिवस म्हणजेच ७२ तासापेक्षा जास्त दवाखान्यात भरती असल्याचे सुद्धा सिद्ध झाले.

त्यामुळे हिंगोली जिल्हा आयोगाच्या अध्यक्ष आनंद जोशी, सदस्य जे.ए. सावळेश्वरकर यांनी विमा कंपनी, त्यांचे संचालक अमर सिन्हा यांनी तक्रारदार यांना रक्कम रु. दोन लाख ५० हजार जुन २०२१पासून ९ टक्के व्याजदराने द्यावे. तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी दहा हजार व तक्रारीचा खर्च दोन हजार असे एकूण बारा हजार आदेशाची प्रत मिळाल्यापासून ४५ दिवसात देण्याचे आदेश दिले आहेत.

यामध्ये तक्रारदार यांच्या वतीने ऍड. पवनकुमार भन्साळी यांनी बाजू मांडली व त्यांना ऍड. राघव लाहोटी व ऍड. नेहा अलग यांनी सहकार्य केले असल्याचे ऍड. भन्साळी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: जरंडेश्वर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरु! अजित पवारांच्या मागे ससेमिरा?

Deepika Padukone: मॉम टू बी दीपिकाच्या पिवळ्या रंगाच्या ड्रेसचा 72 तासात लिलाव; मिळालेल्या पैशाचं काय करणार?

Kajol :'आली रे आली महाराग्नी आली' काजोलचा 'धाकड' अंदाज; भन्नाट अ‍ॅक्शन आणि बोल्ड लूक

Latest Marathi Live News Update : पश्चिम बंगालमध्ये लोकल ट्रेन रुळावरून घसरली

Shivaji Nalavade: मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी NCPकडून उमेदवारी जाहीर; शिवाजीराव नलावडेंच्या नावावर शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT