tamsa.jpg 
मराठवाडा

कोरोनाने व्यवसाय थांबविला, पण वादळाने व्यवसाय मोडला

शशिकांत धानोरकर


तामसा, (ता.हदगाव, जि. नांदेड) ः तामसा येथील जुने बसस्थानक परिसरात असलेले केशकर्तनालय मंगळवारी (ता. २८) सायंकाळी जोरदार वाऱ्याच्या तडाख्याने झाड कोसळून उद्‍ध्वस्त झाले आहे. त्यामुळे संकटामुळे आधीच व्यवहार बंद असलेल्या काशिनाथ कोंडामंगल कुटुंबीय केशकर्तनालयावर झाड कोसळल्यामुळे उघड्यावर आले आहे. मूळचे लोहा (ता. हदगाव) येथील कोंडामंगल हे तामसा येथे जुने बसस्थानक परिसरात केशकर्तनालय चालवून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. लॉकडाउन कारणाने मागील महिन्यापासून केशकर्तनालय बंद असल्यामुळे कोंडामंगल कुटुंबीयांची अवस्था बिकट बनली आहे. व्यवसायावर पोट असलेल्या या कुटुंबीयांची परवड होत आहे.

तोंडून शब्दही बाहेर पडत नव्हता

मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक आलेले वारे कोंडामंगल कुटुंबीयांसाठी मात्र व्यवसायाच्या बाबतीत ‘काळ’ बनले. केसकर्तनालयाच्या मागील बाजूस जिल्हा परिषद शाळेच्या आवारात असलेले जुने झाड वादळी वाऱ्याचा तडाखा उन्मळून उखडले व कोंडामंगल यांच्या केशकर्तनालयावर आढळले. ज्यामध्ये पत्राने बनवलेले केशकर्तनालय पूर्ण उद्ध्वस्त झाले आहे. आपल्या दुकानाबाबत घडलेला प्रकार ऐकून काशिनाथ हे धावत आले. दुकानावर पडलेले मोठे झाड बघून त्यांच्या तोंडून शब्दही बाहेर पडत नव्हता, डोळे पाणावले होते. 

ज्या झाडाने त्यांना व त्यांच्या व्यवसायाला सावली व आधार दिला होता, तेच झाड त्यांच्यासाठी आज काळ ठरले होते. हा दुर्देवी प्रकार घडल्यानंतर कोंडामंगल कुटुंबाबद्दल कोरोनासंकटामुळे व्यवहार बंद होणे व केशकर्तनालयावर झाड पडून दुकान उद्ध्वस्त होण्याच्या दुर्देवी घटनेमुळे शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीने पडलेले झाड हटविले. पण कोंडामंगल यांचे केशकर्तनालय मात्र पूर्ण उद्‍ध्वस्थ झाले असून त्यांचे जीवनच दुःखाच्या खाईत लोटले आहे. महिन्यापासून हाताला काम नसल्यामुळे मेटकुटीला आलेले हे कुटुंब आता मात्र, पूर्ण उघड्यावर आले असून त्यांना समाजिक बांधिलकी म्हणून आधार व दिलासा देण्यासाठी शासन व सामाजिक भूमिकेतून कार्य करणाऱ्या नागरिक व संस्थांनी मदत करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT