संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

कोरोनाच्या उपचारासाठी पूजा मोरेंकडून तीन महिन्यांचे मानधन 

सकाळ वृत्तसेवा

गेवराई (जि. बीड) - शेतकरी आणि सामाजिक चळवळीत अग्रेसर असणाऱ्या येथील पंचायत समिती सदस्या पूजा मोरे यांनी आपले तीन महिन्यांचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देऊ केले आहे. कोरोनामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी व शेतमजुरांना मदतीसाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. 

अभियंता असलेल्या पूजा मोरे शिक्षण काळातच राजकीय फडात उतरल्या आणि पंचायत समितीला विजयी झाल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या प्रमुख असलेल्या पूजा मोरे यांना शेतकरी आंदोलनादरम्यान अटकही झाली आहे. दरम्यान, आता कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांचा भाग म्हणून संचारबंदी, जमावबंदी आणि लॉकडाऊन जाहीर केले आहे. यामुळे शेतकरी व शेतमजूर मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडला आहे. अडचणीतील विविध घटकांच्या मदतीसाठी आता अनेकांनी हात पुढे केले आहेत. पंचायत समिती सदस्या पूजा मोरे यांनीदेखील आपले तीन महिन्यांचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देऊ केले आहे. याबाबत त्यांनी शुक्रवारी (ता. २७) गेवराईच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT