corona new 
मराठवाडा

Corona Updates: उमरग्यात २६ दिवसांत कोरोनाचे ३७ रूग्ण; धोका वाढतोय... तरीही बेफिकीरी!

अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद):  उमरगा शहर व ग्रामीण भागात गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान तालुक्यातील जकेकूर येथील एका जेष्ठ नागरिकाचा गुरूवारी (ता.२५) रात्री मृत्यू झाला आहे. 
उमरगा तालुक्यात कोरोनाच्या संसर्गाने आतापर्यंत दोन हजार ३५५ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली आहे, नोंव्हेंबर, डिसेंबरच्या महिन्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे चित्र होते, नवीन वर्षातील जानेवारी महिन्यात हळूहळू संसर्ग व सुरू झाला.

कसगीतील एका ५५ वर्षीय महिलेचा तर जकेकुरच्या ७८ वर्षीय पुरुषाचा उपजिल्हा रुग्णालयात १३ जानेवारीला मृत्यु झाला होता. तर २२ जानेवारीला  शहरातील आरोग्यनगरमधील ६२ वर्षीय महिलेचा उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात कोरोना संक्रमणाची वाटचाल सुरु झाली आहे. एक फेब्रुवारीपासुन शुक्रवारपर्यंत (ता.२६) ३७ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात रॅपीड चाचणीतील २१ तर आरटीपीसीआर चाचणीत सोळा रूग्ण होते.

या महिन्यात दोघांचा मृत्यू झाला. त्यातील गुरुवारी रात्री जकेकुर येथील एका ६५ वर्षीय जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी या नागरिकाला अस्वस्थ वाटू लागल्याने शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे घेण्यात आलेल्या रॅपीड चाचणीत तो पॉझिटिव्ह आढळून आला. त्यानंतर त्याचा उपजिल्हा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.

धोका तरीही बेफिकीरी !
राज्यातील अनेक जिल्हयात कोरोना संक्रमण वाढू लागले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही संक्रमणाचा धोका सुरू झाला आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी नियमावली जाहीर केली आहे.

विनामॉस्क फिरणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे. ही कारवाई रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वारासाठीच असते का ? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. हॉटेल्स, सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीत उजळ माथ्याने जणू कोरोनावर मात केल्यासारखे तोंडाला, नाकाला मास्क नसणाऱ्या व्यक्ती भरपूर दिसताहेत, त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई होणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT