covid 
मराठवाडा

Corona Updates: बीडमध्ये २४ तासांत २८३ जणांना कोरोनाची बाधा; दोन रुग्णांचा मृत्यू

दत्ता देशमुख

बीड: कोरोना विषाणू संसर्गाचा कहर सुरुच आहे. मंगळवारी (ता. १६) रुग्णसंख्या पावणे तीनशेच्या पुढे गेली. २८३ नवीन रुग्णांची नोंद होऊन आणखी दोन कोरोनाग्रस्तांचे मृत्यू झाले. दरम्यान, हॉटेल व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेऊन बंदचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.

सोमवारी (ता. १५) तब्बल २ हजार ६६५ लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. १० ते १५ मार्चपर्यंत जिल्हाभरात व्यापाऱ्यांची रॅपीड अँटिजेन तपासणी मोहीम झाल्याने आकडे वाढले आहेत. यामध्ये मंगळवारी हाती आलेल्या अहवालात २८३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्याची रुग्णसंख्या २० हजार ९५८ झाली.

१९ हजार ३०६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर, मंगळवारी कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आकडाही आणखी दोनने वाढला. आतापर्यंत जिल्ह्यातील ५९५ कोरोनाग्रस्तांचे मृत्यू झाले आहेत. 

हॉटेल व्यवसायिकांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला-
जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात लॉकडाऊन करू नये आणि हॉटेल, बिअर बार बंदचे आदेश मागे घ्यावेत, या मागणीसाठी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची भेट घेऊन निवेदन दिले. शासनाचे नियम जनतेसह व्यापाऱ्यांनीही तंतोतंत पाळावेत. सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करावा. रुग्ण वाढले तर नाइलाजास्तव लॉकडाऊन लावावे लागेल, असे श्री. जगताप यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यास तयार, पण...''; ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा मोठा निर्णय

Junnar News : जुन्नरमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Army Success Story: कष्टाच्या जाेरावर भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी अभिषेक बिडकर; १३ लाख विद्यार्थ्यांमधून यशाला गवसणी, आई-वडिलांच्या डाेळ्यात पाणी!

Maharashtra Kesari: मानाच्या गदेसाठी हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड लढणार; जय पाटील, सिकंदर शेख पराभूत

Baramati News: कृषी फीडरवरील वीजपुरवठा सलग पाच दिवस खंडित; ग्रामीण भागात संताप

SCROLL FOR NEXT