covid 19 covid 19
मराठवाडा

दिलासादायक! मराठवाड्यातील रुग्णवाढ दोन हजारांच्या आत

घटत्या रुग्णसंख्येने दिलासा, मराठवाड्यात १९०७ नवे कोरोनाबाधित

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: मराठवाड्यात कोरोना रुग्णांची (covid 19) संख्या सातत्याने कमी होत असून दिलासा मिळत आहे. गुरुवारी दिवसभरात १ हजार ९०७ रुग्ण आढळले. जिल्हानिहाय वाढलेल्या रुग्णसंख्येत बीडमध्ये ६०३, उस्मानाबाद ३५६, औरंगाबाद २९९, नांदेड २०१, लातूर १९३, परभणी १२२, हिंगोली ८५ रुग्णांचे निदान झाले आहे. उपचारादरम्यान आणखी ६५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात लातुरमध्ये २२, औरंगाबाद १२, बीड-उस्मानाबादेत प्रत्येकी ८, हिंगोली ५, नांदेड ४, परभणी-जालन्यात प्रत्येकी तिघांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आणखी १२ जणांचा मृत्यू झाला. हर्सूल येथील पुरुष (वय ७०), सईदा कॉलनीतील पुरुष (५६), गाडे पिंपळगाव येथील पुरुष (३०), संग्रामनगर, सातारा येथील पुरुष (६७), पानवी बुद्रूक (ता. वैजापूर) येथील महिला (७५), गंगापूर येथील पुरुष (७३), खामगाव (ता. फुलंब्री) येथील महिला (६३), शनिदेवगाव (ता. वैजापूर) येथील पुरुषाचा (५३) घाटी रुग्णालयात तर खासगी रुग्णालयात चार जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ३ हजार १३५ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

औरंगाबादेत २९९ बाधित, १२ मृत्यू-
औरंगाबाद जिल्ह्यात २९९ कोरोनाबाधित आढळले. यात शहरातील ९८, ग्रामीण भागातील २०१ जण आहेत. आता रुग्णांची संख्या १ लाख ४१ हजार ७५० वर पोचली आहे. बरे झालेल्या आणखी ५४८ जणांना सुटी देण्यात आली. त्यात शहरातील १६०, ग्रामीण भागातील ३८८ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत १ लाख ३४ हजार पाच रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ४ हजार ६१० जणांवर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Crime : प्रेयसीसाठी मृतदेहाची लावली विल्हेवाट? हाडांच्या तुकड्यांनी उघड केलं 4 लाखांच्या बदल्याचं भयंकर गुपित, मुंबईतील महिलेला अटक

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावरील शिवसमाधी परिसरात लावलेला अनधिकृत बोर्ड रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी काढून टाकला

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

SCROLL FOR NEXT