covid 19 
मराठवाडा

Corona Updates: लातुरकरांनो काळजी घ्या! लातुरात २४ तासांत नवीन कोरोना रुग्णांचा उच्चांक

सकाळवृत्तसेवा

लातूर: जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून गुरुवारी (ता. आठ) रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. एक हजार ४०४ जणांना कोरोनाची लागण झाली. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात दोन हजार २०० आरटीपीसीआर चाचण्यांतून ४३२ तर तीन हजार ६५० ॲन्टीजेन चाचण्यांतून ९७२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. रुग्णसंख्या ४० हजार ५३१ वर पोचली असून सध्या ८ हजार ३२४ जणांवर उपचार सुरु आहेत. ३१ हजार ४१० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ७९७ जणांना मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात गुरुवारी (ता. आठ) दाखल झालेल्या केंद्रीय आरोग्य पथकाने शुक्रवारी (ता. नऊ) शहरातील विविध ठिकाणी भेटी देऊन कोरोना उपाययोजनांची माहिती घेतली. उपाययोजनांतील अडचणी जाणून घेऊन त्यांच्या नोंदीही घेतल्या. लसीकरणाच्या कामात ऑनलाइन मनुष्यबळाच्या तुटवड्याचीही दखल पथकाने घेतली. दिवसभर शहरात पथकाच्या दौऱ्यामुळे आरोग्य व वैद्यकीय यंत्रणा सतर्क व सज्ज असल्याचे चित्र दिसून आले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT