file photo 
मराठवाडा

हिंगोलीत कोरोना लसीकरणाचा शुभारंभ, २०० आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार लस

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता. १६) येथील जिल्हा रुग्णालयात शंभर तसेच कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये शंभर अशा एकूण दोनशे  डॉक्टर व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाणार आहे . 

जिल्हा सामान्य रुग्णालयात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली. शनिवारी सकाळी ८.३० वाजल्यापासून कोरोना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय व कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालय या दोन केंद्रातील डॉक्टर, आरोग्य सेवक तसेच परिचारिकांना ही लस देण्यात येणार आहे.

लसीकरण शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.  शिवाजी पवार, डॉ. गोपाल कदम यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, जिल्ह्यात सहा हजार ६५० कोरोना लस उपलब्ध झाली असून कोविन अँपवर नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांना तीचे वाटप केले जाणार आहे. तसेच टप्पटप्याने ही लस जिल्ह्यात दिली जाणार असल्याचे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. टापरे यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुणी गॅस देता का गॅस? मुंबईत ४-५ किमीपर्यंत रांगा, पुण्यात पहाटेपासून लोक रांगेत; काळ्याबाजारात एक किलोसाठी ५०० ते ७०० रुपये

Breaking: IPL 2026 चं वेळापत्रक बदलणार? RCB चे सामने एम चिन्नास्वामीवर होणार की नाही? आले मोठे अपडेट्स

Latest Marathi Update : युद्धाचा परिणाम झेंडू बाजारावर; दर घसरल्याने शेतकरी अडचणीत

धक्कादायक ! ICU मधील वृद्ध महिला रुग्णाला उंदरांनी कुरतडले; रुग्णालयाचा मोठा निष्काळजीपणा उघड

IPL 2026 Marathi News: ना CSK, ना KKR... आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये कोणते चार संघ पोहोचणार? ऑरेंज कॅप, पर्पल कॅप कोणाला?

SCROLL FOR NEXT