file photo 
मराठवाडा

कोरोना व्हायरस: हिंगोलीत मंगल कार्यालय, लॉन, फंक्‍शन हॉल बंद

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्‍ह्‍यात कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता त्‍याचा प्रादुभाव होवू नये म्‍हणून मंगल कार्यालय, लॉन, फंक्‍शन हॉल तसेच इतर गर्दी होणारी कार्यक्रमाची स्‍थळे (ता. ३१) मार्चपर्यंत बंद करण्याबाबतचे आदेश जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. 

शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ (ता. १३) मार्च २०२० पासून लागू करून खंड दोन, तीन व चार मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमीत केली आहे. सदर आजारामुळे जगभरात अनेक लोकांचे मृत्‍यू झाल्याचे व भारतासह जगभरात हजारो लोकांना कोरोना रोगाची लागण झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्‍याअनुषंगाने प्रतिबंधात्‍मक उपाय योजना करण्यासाठी जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांची सक्षम अधिकारी म्‍हणून नियुक्‍ती केलेली आहे. 

ता. ३१ मार्चपर्यंत पुर्णतः बंद करण्याबाबचे आदेश जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी

त्‍याप्रमाणे जिल्‍ह्‍यात नागरिकांची एक ठिकाण होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्‍ह्‍यातील लग्न समारंभ कौटूंबीक मोठी कार्यक्रमे अथवा तत्‍सम स्‍वरूपाचा अन्य समारंभ यासाठी वेगवेगळ्या ठिकाणावरून नागरिक, नातलग उपस्‍थित राहत असतात. त्‍यामुळे गर्दी होऊन कोरोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो. जिल्‍ह्‍यात कोरोनाचा रोगाचा प्रादुर्भाव होवू नये तसेच जिवीत हानी होवू नये या दृष्टीने सुरक्षीततेची उपाययोजना म्‍हणून साथरोग कायदा १८९७ नुसार प्रदान केलेल्या शक्‍तीचा वापर करून जिल्‍ह्‍यातील सर्व मंगल कार्यालये, लॉन्स, फंक्‍शन हॉल तसेच इतर गर्दी होणारी कार्यालये ता. ३१ मार्चपर्यंत पुर्णतः बंद करण्याबाबचे आदेश जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. 

अधिपत्‍याखालील सर्व अस्‍थापनाना सुचीत

या बाबत तात्‍काळ कार्यवाही करण्या बाबत आपल्या अधिपत्‍याखालील सर्व अस्‍थापनाना सुचीत करण्यात यावे तसेच या बाबत अनुपालन अहवाल न करणाऱ्या कोणत्‍याही व्यक्‍तीने अथवा संस्‍थेने भारतीय दंडसंहिता १८६० (४५) कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येवून कार्यवाही करण्यात येईल अशा सुचना त्यांनी दिल्या आहेत. हा आदेश बहुसंख्य व्यक्‍ती पर्यत पोहचणे हिताचे असल्याने या आदेशाची जास्‍तीत जास्‍त प्रसिध्दी करण्यात यावी. तसेच सदर आदेश सर्व उपविभागीय, तालुका दंडाधिकारी, उपविगागीय, निरिक्षक,  पोलीस स्‍टेशन यांचे कार्यालयाचे नोटीस बोर्डावर डकवून प्रसिध्दी देण्यात यावी सदर आदेशाची तात्‍काळ अंमलबजावणी करावी असे आवाहन जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

श्रद्धा कपूर अंबाबाईचरणी नतमस्तक, कोल्हापुरात जाऊन घेतलं देवीचं दर्शन, VIRAL VIDEO

Hasan Mushrif Statement : जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचाच, हसन मुश्रीफांनी ६ महिन्यापूर्वीच देवेंद्र फडणवीसांना दिली होती माहिती

Latest Marathi News Live Update : पुणे सातारा हायवेवर टेम्पो-ट्रकची धडक; एकाचा मृत्यू

Ro-Pax: रो-पॅक्स सेवा खरंच परवडणारी? भाडे विमान तिकिटापेक्षा जास्त, डोळे फिरवणारे तिकीट दर पहाच...

Panchang 22 February 2026: आजच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण आणि ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT