तीर्थपुरी : गावातील गल्लोगल्लीत भाजीपाला विकताना शेतकरी.  
मराठवाडा

शेतकरी भाजीपाला घेऊन दारोदारी 

तुकाराम शिंदे

तीर्थपुरी, (जि. जालना) -  कोरोना विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे बाजारपेठ ठप्प झाल्या आहेत. अशात शेतातील भाजीपाला जागीच सडण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी थेट घरोघरी जाऊन भाजीपाला विक्री करत आहे. शेतकऱ्यांचे शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील गल्लो गल्लीत भाजी घेता का भाजी असे आवाज घुमू लागले आहेत. 

सर्वत्र संचार बंदी असल्यामुळे सर्वच बाजारपेठ बंद आहेत. त्यामुळे शेतकरी गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून भाजीपाला कसा विक्री करा या चिंतेत होता.

गेल्या दोन आठवड्यापासून येथील आठवडी बाजार बंद झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले होते. परंतु आता शेतकऱ्यांनाही थेट आपला भाजीपाला घेऊन गावातील गल्लोगल्लीत जात आहे. जाऊन भाजी घेता का हो भाजी असे म्हणत भाजी विक्री करू लागले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची ही अडचण दूर झाली असून घरपोच भाजीपाला मिळत असल्याचे समाधान व्यक्त होत आहे. 

भाजी पाल्याचे दर वाढले 

बाजारपेठ बंद असल्याने भाजीपाला मिळणे अवघड झाले होते. परंतु आता घरबसल्या भाजीपाला मिळत असून या भाजीपाल्याचे भाव दुप्पटीने वाढले असले तरीही ग्रामस्थ भाजीपाला घरपोच मिळत असल्याच्या आनंदात खरेदी करताना दिसत आहेत. 

गेल्या दोन आठवड्यापासून शेतातील भाजीपाला कसा विक्री करावयाच्या चिंतेत होतो. सर्वत्र संचारबंदी लागू असल्याने बाजारात भाजीपाला घेऊन बसणे शक्य नव्हते. त्यामुळे दुचाकीला भाजीपाल्याचे कॅरेट बांधून घरपोच भाजीपाला विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे घरपोच भाजीपाला दिला जात असल्याने दोन पैसे जास्त मिळत आहेत. 
- महादेव कडूकर,
भाजी विक्रेता शेतकरी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT