File Photo
File Photo 
मराठवाडा

‘एलआयसी’च्या या विभागाला कोरोनाचा फटका; उत्पन्न पन्नास टक्याने घटले

शिवचरण वावळे

नांदेड : भारतीय जीवन विमा कंपनीच्या नांदेड विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये चांगली कामगिरी करण्याचा मानस ठेवला होता. त्या दृष्टीने सर्वच आघाड्यांवर उद्दिष्टे साध्य करण्याचे लक्ष ठरविले होते. परंतु कोट्यावधीचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या एलआयसीच्या एजंटांचे कोरोनामुळे ग्राहकांशी भेटून संवाद साधणे कमी झाल्याने व एलआयसी कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाल्याने नांदेडच्या एलआयसी विभागाचे उत्पन्न तब्बल पन्नास टक्क्यांनी घटले आहे.

‘कोरोना’ने एलआयसीच्या अपेक्षा भंग

नुकतेच नांदेड विभागाने १०९ कोटी रुपये इतका नॉन सिंगल प्रिमियम पूर्ण करत वार्षिक उद्दिष्ट साध्य केले आहे. त्यानंतर लवकरच एक लाख १४ हजार नवीन पॉलिसी पूर्ण करण्यासाठी सर्व आघाड्यांवर हे उद्दिष्ट साध्य करण्याचे निश्चित केले होते. तसेच पश्चिम क्षेत्रामध्ये उद्दिष्ट साध्य करुन विभागास प्रथम क्रमांकाचा सन्मान प्राप्त करू देण्याचा मानस होता. यासाठी मार्च महिन्यामध्ये सुमारे २८ हजार पॉलिसीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला होता. मात्र ‘कोरोना’ने एलआयसीच्या अपेक्षांवर पाणी फिरवले आहे.

आॅनलाईन पॉलिसी विक्रीवर भर

नांदेड विभागाने मायक्रो इन्शुरन्स, डायरेक्ट मार्केटिंग ह्या दोन नवीन पॉलिसीत आघाडी साधत उद्दिष्ट्य साध्य केलेले आहे. या वर्षीचे सर्व दावे ता. ३१ मार्चपूर्वी देण्याचा निर्धार केला आहे. यासाठी नांदेड विभागातील एलआयसीच्या सर्वच शाखा कार्यालय तसेच विभागीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी विकास अधिकारी आणि विमा प्रतिनिधी कार्य करत आहेत. एलआयसी ने नुकत्याच निवेश प्लस आणि एलआयसी सिप या दोन नवीन योजना सादर केल्या आहेत. दोन्ही योजना शेअर मार्केटची संबंधित आहेत. परंतु कोरोनाच्या भीतीमुळे सध्यातरी या दोन्ही योजनास केवळ आनलाईनच्या माध्यमातूनच खरेदी सुरु आहे.

घरपोच ग्राहक सेवा देण्यासाठी तत्पर

सध्या ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सर्व विमाधारकांनी विमा हप्ता भरण्यासाठी एलआयसीच्या कस्टमर पोर्टल, एटीएम, पेटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड असा विविध उपलब्ध सुविधांचा वापर करावा. पॉलिसीच्या इतर सेवांसाठी तसेच नवीन पॉलिसी घेण्यासाठी आपण आपल्या विमा प्रतिनिधीशी संपर्क साधावा. विमा प्रतिनिधी घरपोच ग्राहक सेवा देण्यासाठी तत्पर आहेत.
- जनार्दन लामतुरे, वरिष्ठ विभागीय अधिकारी. एलआयसी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT