corona 
मराठवाडा

परभणी जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढलेलाच, मंगळवारी ५९ जण पॉझिटिव्ह  

गणेश पांडे

परभणी ः जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्गाचा प्रसार मोठ्या प्रमाणात सुरु झाला आहे. सोमवार वगळता गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत जात आहे. मंगळवारी (ता.नऊ) दिवसभरात तब्बल ५९ नवे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. तर तिघांनी कोरोनावर उपचार घेताना स्वतःचा जीव गमावला आहे. 

३३५ जणांवर उपार सुरु 
जिल्ह्यात कोरोनाची लागण होण्याचा वेग वाढला आहे. दिवसभरातील कोरोनाचा चाचण्यांच्या आकडेवारीसह कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचीही संख्या मोठी आहे. जिल्ह्यात मंगळवारी (ता.नऊ) तब्बल ५९ नवे रुग्ण कोरोनावर उपचार घेण्यासाठी भरती झाले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील खासगी व सरकारी कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या आता ३३५ एवढी झाली आहे. दिवसभरात केवळ १३ जणांनी कोरोनार मात केल्याने त्यांना घरी पाठविण्याचा निर्णय तज्ज्ञ डॉक्टरांनी घेतला. 

लोकांची बेफिकरी, सोशल डिस्टसिंगचा फज्जा 
जिल्ह्यात सोशल डिस्टसिंगचा उडालेला फज्जा व लोकांची बेफिकरी हे एकमेव कारण या रुग्ण संख्येच्या वाढत्या आलेखाला कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्टपणे दिसते. जिल्ह्यात आजपर्यंत आठ हजार ९३८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी आठ हजार २६६ जण कोरोनामुक्त होऊन सुखरुप घरी परतले आहेत. ३३७ जणांनी उपचारादरम्यान स्वतःचा जीव गमविला आहे, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. 


जिल्ह्यात एक हजार ५८३ खाटा रिक्त 
जिल्ह्यात एकूण एक हजार ९१८ कोरोनासाठी खाटा आरक्षित केलेल्या आहेत. त्यापैकी ३३५ खांटावर रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात सर्वाधिक १७८ रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. ७९ रुग्ण आयटीआयच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. चिरायू हॉस्पीटलमध्ये १५, परभणी आयसीयू मध्ये १५, हाजी अशरफ पाडेला हॉस्पीटलमध्ये ६, लाईफ लाईन हॉस्पीटलमध्ये ३५, भारत हॉस्पीटलमध्ये सात असे ३३५ रुग्ण उपचार घेत आहेत. 

जिल्ह्यात ७७९ नमुने घेतले तपासणीला 
जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (ता.नऊ) परभणी मनपा रुग्णालयासह, जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण तसेच उपजिल्हा रुग्णालय मिळून ७७९ आरटीपीसीआर नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाने प्रेसनोटद्वारे दिली. यात परभणी मनपाचे अप्राप्त, जिल्हा रुग्णालयात ४४, आयटीआय कोव्हिड हॉस्पिटल येथे ४९, अस्थिव्यंग रुग्णालय सात, परभणी ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालय येथे १२ नमुने तपासणीला घेण्यात आले. 


दिवसभरात १३ रुग्ण कोरोनामुक्त 
जिल्ह्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या त्या तुलनेत कमी आहे. मंगळवारी (ता.नऊ) १३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ५९७ नमुने तपासणीला घेतले होते, त्यापैकी ५३८ निगेटिव्ह, ५९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.


संपादन ः राजन मंगरुळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT