file photo 
मराठवाडा

परभणी जिल्ह्यातील जिंतुरमध्ये धुलीवंदनावर कोरोनाचे सावट

राजाभाऊ नगरकर

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : धूळवड किंवा धुलीवंदन हा रंगोत्सवाचा सण यावर्षीदेखील कोरोनाच्या सावटाखाली आला असल्याने सणाच्या आनंदावर विरजण पडणार असल्याने तरुणाई हिरमुसली आहे.

होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन हा उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी राग- रुसवा बाजूला सारुन एकमेकास रंग लावून वेगवेगळ्या स्तरातील, क्षेत्रातील महिलांसह अबालवृध्द नागरिक हा उत्सव साजरा करतात. लहान मुले व तरुणाईच्या आनंदाला उधाण येते. परंतु गत वर्षापासून कोरोना महामारीच्या सावटाखाली साजरा साजरा केल्या जात आहे. यावर्षीदेखील कोरोनाच्या नियमात धुलीवंदन साजरे करावे लागणार आहे. अन्यथा नियमाचं उल्लंघन झाल्यास रंगाऐवजी पोलिसच आपला रंग बदलण्याची शक्यता असल्याने घरीच कुटुंबासोबत रंग खेळावे लागणार आहेत.

गुलालचा वापर हा त्वचेसाठी चांगला 

रंग खेळताना गुलालाचा वापर चांगला असून त्यामुळे थंडीमुळे कोरडी पडलेली त्वचा गुलाल आणि अबीरमुळे टवटवीत होते, असे तज्ञांचे मत आहे. सध्या वापरण्यात येणाऱ्या रंगांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याने ते शरीरासाठी घातक ठरतात. त्यामुळे अलीकडे अनेकजण पळसाच्या फुलांपासून तयार केलेल्या रंगाचा वापर करतात.

रंगविक्रत्यांचे नुकसान 

यावर्षीदेखील कोरोनाचे सावट असल्याने विक्रेत्यांनी रंग, पिचकाऱ्या बाहेरुन मागविल्या नाहीत. कोरोनामुळे मागील वर्षीचेच रंग, पिचकाऱ्या व इतर साहित्य विक्री झाले झाले नाही ते यावर्षीतरी विकले जातील अशी विक्रेत्यांनी अपेक्षा होती. परंतु याही कोरोनाचे सावट पसरले असून ऐन सणाच्या काळात संचारबंदी लागू झाली. त्यामुळे आता पुढील वर्षाच्या प्रतिक्षेत लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत असल्याची खंत अनेक विक्रेत्यांनी व्यक्त केली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Final: भारत-पाकिस्तान 'सुवर्ण' लढत! श्रीलंकेला लोळवून श्रेयस अय्यरचा संघ फायनलमध्ये; केव्हा होणार हा महामुकाबला?

पत्ता बदलण्यासाठी Form 8 भरला अन् कुटुंबातील सहा सदस्यांची नावेच गायब; SIR प्रक्रियेवर मुंबई हायकोर्टाचा सवाल, कायदा पाळण्याची तंबी

Wicknell Chivayo Death : झिम्बाब्वेत हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; जगप्रसिद्ध उद्योगपती विकनेल चिवायोसह सहा जणांचा मृत्यू

Jio ची मोठी ऑफर! 6 महिन्यांचा रिचार्ज आणि 14GB डेटा मिळणार फ्री; 'या' युझर्सना होणार फायदा...

Latest Marathi News Live Update : MPSC विद्यार्थ्यांचं 2 ऑक्टोबरचं आंदोलन स्थगित; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT