परभणी कोवीड सेंटर 
मराठवाडा

परभणीत बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले; मृत्युचा आकडा तरीही चिंताजनक

परभणी जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर अद्यापही सुरुच आहे.

गणेश पांडे

परभणी ः गेल्या दोन वर्षापासून मानव जातीच्या मुळावर उठलेल्या कोरोना विषाणु संसर्ग (Coraona virus) आता थोडा कमी होतांना दिसत आहे. परभणी जिल्ह्यात (Parbhani dist) मे महिण्याच्या पहिल्याच आठवड्यात बाधित रुग्णांपेक्षा कोरोना मुक्त होणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. हा आकडा समाधानकारक असला तरी मृत्यु पावणाऱ्यांची (numbers of death) संख्या अजूनही चिंताजनक आहे. त्यामुळे अजूनही कोरोना नियमांचे पालन करून त्याच्याशी लढाई सुरुच ठेवावी लागणार आहे. Coronation-free rates increased in Parbhani compared to those affected; The death toll is still alarming

परभणी जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर अद्यापही सुरुच आहे. दररोज बाधित रुग्णांचा आकडा शेकड्यात आहे. त्यामुळे सरकारीच काय तर खासगी दवाखाने देखील कोरोना रुग्णांनी भरगच्च आहेत. जानेवारी पासून ते तब्बल एप्रिल महिण्यापर्यत कोरोनाचा आलेख वाढलेलाच होता. त्यातून परभणीकरांना कधीच सुटका भेटली नाही. त्यात तर मार्च व एप्रिल महिना सर्वांधिक रुग्ण संख्येचा ठरला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य, महापालिका व पोलिसांवरील कामाचा ताण वाढला आहे. परंतू परभणीकरांचा सर्वाधिक काळ हा संचारबंदी व अंशत: टाळेंबंदीत गेला. त्याचा चांगला परिणाम आता पहावायास मिळत आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या नियोजनबध्द व कडक निर्णयामुळे परभणीकरांवरील कोरोना संसर्गाचे प्रमाण आता कमी होतांना दिसत आहे.

हेही वाचा - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकरी व नागरिकांसाठी 100 बेडचे मोफत कोवीड सेंटर उभारण्यात येत आहे

पॉझिटीव्हचा आकडा ४० टक्क्याच्या खाली

जिल्ह्यात दररोज नागरीकांच्या आरटीपीसीआर व रॅपीट अन्टीजन टेस्ट केल्या जात आहेत. त्यात एकूण तापसण्याच्या ४० टक्के व त्यापैक्षाही कमी रूग्ण सापडत आहेत. ता. १ मे ८ मे दरम्यान तब्बल १९ हजार ५४१ तपासण्या करण्यात आल्या. त्यात १४ हजार ७७७ जणांच्या आरटीपीसीआर तर ४ हजार ७६४ जणांच्या रॅपीड अन्टीजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. आठवडाभरातील एकूण तपासण्यापैकी केवळ ६ हजार १४५ जण कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. तर १३ हजार ३०५ जणांच्या चाचण्याचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

मृत्युची संख्या चिंताजनक

कोरोनाबाधितांचा आकडा जरी आता खाली येत असला तरी या आठवड्यात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. या आठवड्यात तब्बल १२६ जणांची जीवनयात्रा संपली. त्यात ता. ६ मे हा दिवस सर्वाधिक लोकांच्या मृत्युचा होता. त्या दिवशई २४ जणांचे प्राण गेले होते. तर सर्वात कमी ता. २ व ८ मे रोजी ९ जणाचा मृत्यु झाला होता. त्यामुळे बाधितांची संख्या जरी कमी होत असली तरी प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोनाच्या नियमाचे पालन आपल्याला अजून काही दिवस कडक पध्दतीने करावेच लागणार आहेत.

आठ दिवसाचा कोरोना अहवाल

तारिख- दाखल- सुट्टी- मृत्यू

ता. १ मे, १०७२, १२११, १९

ता. २ मे, ८२१, ५१२, ०९

ता. ३ मे, ९१७, १२२०, ११

ता. ४ मे, ८४४, ९४३, २०

ता. ५ मे, ७८५, ८०४, ११

ता. ६ मे, ६५०, ६३९, २४

ता. ७ मे, ६२०, ६८४, २३

ता. ८ मे, ४३६, १०३३, ०९

एकूण ६१४५, ७०४६, १२६

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'उंडवडी सुपे येथील अपघातात दाेनजण जागीच ठार'; कार व दुचाकीचा भीषण अपघात

Sangli : शाळेय विद्यार्थिनीला जबरदस्तीने लैंगिक अत्याचार प्रकरणी नवी अपडेट समोर, पळालेल्या संशयितांना अटक; त्यादृष्टीने सखोल तपास

Latest Marathi News Updates : भारतीय अंतरिक्षवीर शुभांशु शुक्ला १४ जुलैपासून पृथ्वीवर परतीच्या प्रवासाला सुरुवात करतील - नासा

Pune Goodluck Cafe Viral Video: पुण्यातील गुडलक कॅफेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा; खवय्यांमध्ये संताप, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT