Beed corona 
मराठवाडा

Coronavirus: धक्कादायक! आश्रमातील तब्बल 29 जणांना कोरोनाची लागण

वैजीनाथ जाधव

गेवराई (बीड): तालुक्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने अँटीजन तपासणी मोहीम हाती घेतली आहे. असून शुक्रवारी (ता.26) रोजी येवले वस्ती, कोल्हेर येथे एका पंथाच्या आश्रमातील एकुण साठ लोकांची अँटीजन तपासणी करण्यात आली. त्यापैकी एकुण एकोणतीस जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांची तपासणी करुन त्यांना कोल्हेर येथेच गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

यामुळे प्रशासनासह परिसरात एकच खळबळ उडाली असून दरम्यान तहसीलदार सचिन खाडे आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सदर आश्रमास भेट दिली. संपर्कात आलेल्यांनी कोरोनासदृश्य लक्षणे असतील तर स्वतःहून समोर येऊन तपासणी करून घ्यावे असं आवाहन खाडे यांनी केलं आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने अँटीजन तपासणी मोहीम हाती घेतली असून शेवटच्या टप्प्यातही कोरोनाने शिरकाव केल्याने दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तपासणीसाठी आरोग्य विभाग परत एकदा सज्ज असून गेवराई तालुक्यातील कोल्हेर येथील येवले वस्ती, येथे एका पंथाच्या आश्रमातील एकूण साठ लोकांची अँटीजन तपासणी करण्यात आली. त्यापैकी एकूण 29 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून त्या कोरोना बाधितांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

या आश्रमात गुरुवारी झालेल्या सोहळ्यास जिल्ह्यातील अनेकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी हजेरी लावली त्यांना जर काही कोरोनसदृश्य लक्षणे असतील तर त्यांनी स्वतःहून समोर येऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार सचिन खाडे यांनी केले आहे. दरम्यान प्रशासकीय पातळीवर बाधितांच्या संपर्क तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामुळे हाय रिस्क झोन घोषित करण्यात आलं असून संपूर्ण येवलेokवस्ती, कोल्हेर येथे अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

कोल्हेर येथील या पंथाच्या सोहळ्यात परिसरातील अनेक भाविक भक्तांनी भेट दिली होती. यामुळे हे देखील पॉझिटिव्ह येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यामुळे त्यांनी स्वतःहून तपासणीसाठी हजार व्हावे व कोरोना विषयी सर्व नियमांचे पालन करावे असे आहवान तहसीलदार सचिन खाडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhor Solar Machinery Vandalism: भोंगवली वादग्रस्त प्रकल्पावर रात्रीच्या वेळी जाळपोळ कामगारांना मारहाण

Ajit Doval Gen Z : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालांनी Gen Z वर केले वक्तव्य; पुण्यातील कार्यक्रमात युवकांना उद्देशून भाषण

Latest Marathi News Live Update : विद्यार्थ्यांनी माफी न मागता माफ कसं करता? संजय राऊत

माझ्या कृतीची लाज वाटते, जे बोलले ते माफीलायक नव्हतं; PM मोदींना शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थीनीचा माफिनामा

Amit Shah : "गुजरातमध्ये बॉम्बस्फोट झाले तेव्हा नरेंद्र मोदी CM..."; अमित शहांनी सांगितला अजित डोवाल यांच्याशी पहिल्या भेटीचा किस्सा

SCROLL FOR NEXT