Latur News 
मराठवाडा

लातूर कोरोना अपडेट : त्या १२ जणांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू

सुशांत सांगवे

लातूर : निलंगा येथे आढळून आलेले कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण निलंग्यात कोणाकोणाच्या संपर्कात आले, त्याचप्रमाणे त्यांच्या हरियाणा ते लातूरपर्यंतच्या प्रवासात ते कुठे  आणि कुणाकुणाच्या संपर्कात आले याचा शोध घेण्याचे काम राज्य सरकारतर्फे सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली. कोणत्याही परिस्थितीत याची कुणालाही लागण होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असेही ते म्हणाले.

लातूर जिल्ह्यात एकाचवेळी ८ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. अनेकांची काळजी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी  हे आठही कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण कोणाकोणाच्या संपर्कात आले याचा शोध घेतला जात आहे, असे सांगितले. 

ते म्हणाले,  हरियाणा राज्यातील नुह जिल्ह्यातील फिरोजपुर झिरका येथे गेल्या तीन महिन्यापासून धार्मिक कार्यासाठी वास्तव्यास असलेले बारा यात्रेकरू २ एप्रिलच्या मध्यरात्री  लातूर जिल्ह्यातील  निलंगा येथील एका धार्मिक स्थळी आढळून आले. या बारा जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठवले असता त्यातील आठ जणांना कोरोना पॉझिटिव्ह  असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या महाविद्यालय रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.  

अन्य चार जणांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन याबाबत सविस्तर माहिती घेत आहे.  या सर्व  यात्रेकरूंवर तसेच अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आलेल्या यात्रेकरूंवर उपचार करताना  पुरेशी काळजी घेण्यात यावी  आणि कोणत्याही परिस्थितीत  याची कुणालाही लागण होणार नाही , याबाबत  दक्षता घेण्याचे आणि या सर्वांवर उपचार करून लॉकडाऊननंतर त्यांच्या मूळ गावी पाठविण्याचे निर्देश  संबंधित यंत्रणेला दिले आहेत, असे देशमुख यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Ambarnath इंधन तुटवड्याच्या अफवेमुळं टाकी फुल्ल केली, दुचाकी पेटली; घटनेचा VIDEO VIRAL

जिद्द आणि कष्टाला वर्दीचा सलाम! नारोडीची लेक ऋतुजा हुले महाराष्ट्र पोलीस दलात; ग्रामीण भागातील तरुणीची स्वप्नपूर्ती

3000 रिक्षांची चाके थांबली! गॅस तुटवड्यामुळे पंपाबाहेर रिक्षांच्या रांगा; ‘एलपीजी’चे दर 32 रुपयांनी वाढले, ‘या’ शहरात रिक्षा प्रवास 10 रुपयांनी महागला

पुणेकरांनो, इंधन तुटवडा नाही, गर्दी करू नका! पेट्रोल डीलर्स असोसिएशनचं आवाहन; राज्य सरकारनेही खरेदीबाबत दिले मोठे अपडेट

SCROLL FOR NEXT