Latur News
Latur News 
मराठवाडा

उजनी ग्रामसमिती अॅक्शन मोडमध्ये : वाचा सविस्तर

केतन ढवण

उजनी (लातूर) : जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूशी दोन हात करण्यासाठी देशपातळीपासून ते गावपातळीपर्यंत शक्य तेवढ्या उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. दिलासादायक बातमी म्हणजे आजपर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला नाही. तरीही खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून सर्व काळजी घेतली जात असल्याचे सर्वत्र चित्र आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार प्रत्येक गावात ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्यामध्ये समितीचे अध्यक्ष म्हणून तलाठी, सचिव म्हणून ग्रामसेवक तसेच सदस्य म्हणून पोलीस पाटील, महिला बचत गट अध्यक्ष, महिला बचत गट सचिव इत्यादी असतील. 

उजनी सज्जा अंतर्गत उजनी, कमालपूर, चिंचोली का.(ता. औसा) येथे स्थापन करण्यात आलेल्या ग्रामस्तरीय अन्न धान्य वितरण नियंत्रण समितीची येथील स्वस्त धान्य दुकानदारासोबत शनिवारी (ता.२८) बैठक झाली. त्यामध्ये केंद्र शासनाकडून गरीब कल्याण योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या धान्याच्या वितरण करण्यासंदर्भात उपाय योजना करण्यात आली. 

वितरण करत असताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. सोबत गावातील किराणा दुकाना समोर ग्राहकांसाठी आखणी करण्यात आली आहे जेणेकरून सामान खरेदी करताना दोन व्यक्तीमध्ये आवश्यक सामाजिक अंतर ठेवण्यास मदत होईल. तसेच येथील घरोघरी जाऊन कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांना घरीच राहण्यासाठी सांगण्यात आले. 

ग्रामस्थांनी एकाच ठिकाणी गर्दी करू नये, सतत हात साबणाने धुवावेत; सर्दी, खोकला, ताप असल्यास त्वरित जवळील शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे ही आवाहन करण्यात आले. यावेळी तलाठी जी. एम. कुंभार, कृषी सहाय्यक बी.एस.घोडके, ग्राम विकास अधिकारी आर. आर. सावंत, उपसरपंच धनराज लोखंडे, कमालपुर पोलीस पाटील संजय गिरी, सरपंच उमेश गिरी आदी समिती सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सह्याद्रीचा माथा : नाशिकचा चक्रव्यूह कोण, कसा भेदणार? 

सोलापूरमध्ये रमेश कदमांची भूमिका ठरणार निर्णायक? २८ एप्रिलच्या मेळाव्याकडे जिल्ह्याचं लक्ष

US Green Card : देश सोडून भारतीय बाहेर का जात आहेत?

Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य - धागा श्रद्धेचा जपावा लागणार!

दृष्टिकोन : राजेशाही, हुकूमशाही अन् लोकशाही

SCROLL FOR NEXT