cotton msp  sakal
मराठवाडा

Cotton Rate: सात महिने घरात कापूस सांभाळूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

Kapus bajar bhav: भाव सात हजारांच्याही खाली ः महिनाभरात दीड हजाराने उतरले भाव; उत्पादक हवालदिल

पांडुरंग उगले

माजलगाव : गतवर्षी १२ हजारापर्यंत विक्रमी भाव खाऊन गेलेल्या कापसाने यंदा शेतकऱ्यांना मोठ्या आशेला लावले होते. तोच भाव यंदाही मिळेल या आशेपोटी मागील सात महिन्यांपासून घरात सांभाळलेल्या पांढऱ्या सोन्यानं बळीराजाची मात्र घोर निराशा केली आहे.

नोव्हेंबर महिन्यात नऊ हजार ८०० रुपये क्विंटल दराने विकलेल्या कापसाचे भाव दिवसेंदिवस घसरत गेले. महिनाभरातच तब्बल दीड हजाराने कापसाचे भाव कोसळल्यानं शेतकऱ्याचं पांढरं सोनं आता सात हजाराचे खाली आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

बीड जिल्ह्यात ग्रीन बेल्ट अन् सधन तालुका म्हणून ओळख असलेल्या माजलगाव तालुक्यात मुबलक पाण्यामुळे उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले असले तरी, गतवर्षी कापसाला मिळालेल्या विक्रमी भावामुळे यंदा बहुतांशी शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली होती.

सुरुवातीला उशिराने आलेला मॉन्सून, कपाशी लागवडीनंतर पावसाने दिलेला खंड, मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासात झालेली अतिवृष्टी या नैसर्गिक संकटामुळे कापसाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला.

परतीच्या प्रवासात झालेल्या अतिवृष्टीमुळे झाडालाच फुटलेल्या कापसाच्या वाती झाल्या तर, काही ठिकाणी फुटलेला कापूस काळा पडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. प्रती एकर उत्पादनात घट होऊनही दहा ते पंधरा रुपये किलो प्रमाणे मजुरी देऊन शेतकऱ्यांनी कापसाची वेचणी केली.

खरेदीच्या सुरुवातीला बाजारपेठेत जवळपास आठ साडेआठ हजार रुपये क्विंटल दराने विकलेल्या कापसाने नंतर चांगलीच उसळी घेत तो साडेनऊ हजार रुपयावर गेला होता.

यामुळे शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित होऊन यंदाही गतवर्षीसारखा १२ हजार रुपयापर्यंतचा भाव मिळण्याची अपेक्षा लागली होती; परंतु मागील तीन महिन्यापासून पुन्हा एकदा कापसाच्या भावाची घसरगुंडी झाली.

साडेनऊ हजार रुपये क्विंटलने विक्री होणाऱ्या कापसाचे दर थेट साडेसात ते आठ हजार रुपयापर्यंत आले. एप्रिल महिन्याच्या मध्यंतरी पुन्हा कापसाचे दर साडेआठ हजारापर्यंत गेले होते.

यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होऊन किमान भाव दहा हजाराचा आकडा गाठेल अशी आशा लागली; परंतु महिनाभरात तब्बल दीड हजाराने भाव कमी झाले.

मागील दोन दिवसांपूर्वी सात हजार ३०० रुपयाने विक्री होणार कापूस सोमवारी (ता. २२) चक्क सहा हजार ८०० ते सहा हजार ९०० रुपये क्विंटलने विक्री झाला. पांढऱ्या सोन्याचे दर चक्क सात हजाराच्याही खाली आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

आवक वाढल्याने कृत्रिम घसरण?

आज वाढतील, उद्या वाढतील म्हणून मागील सात महिन्यापासून बहुतांशी शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला होता. खरिपाची पेरणी तोंडावर आल्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री करायला सुरुवात केली आहे.

आहे त्या भावात शेतकरी कापूस विक्री करीत असल्याने मोठ्या प्रमाणात कापसाची आवक वाढल्याने कापसाचे भाव पडले असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLA Committee: आमदार समितीच्या दौऱ्याला पहिल्याच दिवशी दांडी; २७ पैकी फक्त ८ आमदार उपस्थित, अनियमितता आढळल्याने कारवाईची शक्यता

IND vs SLC XI Warm UP Match: श्रीलंकेच्या सलामीवीरांनी टीम इंडियाला रडवले; ६ गोलंदाज वापरूनही विकेट मिळेना, मानव सुथारच्या...

Thailand School Shooting : थायलंड हादरले ! आठवीच्या विद्यार्थ्याचा शाळेत अंदाधुंद गोळीबार; शिक्षकासह दोघांचा मृत्यू, १० विद्यार्थी गंभीर जखमी

Cricketer Retirement: चक्क २५ व्या वर्षीच क्रिकेटमधून निवृत्ती! युवा वेगवान गोलंदाजाचा धक्कादायक निर्णय

Jalgaon Flyover Proposal : जळगाव महामार्गावर होणार 3 नवीन उड्डाणपूल! खासदार स्मिता वाघ यांच्या प्रस्तावाला गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद, 'त्या' पुलाचीही घेतली गंभीर दखल

SCROLL FOR NEXT