file photo 
मराठवाडा

हिंगोली जिल्ह्यात ४२२ ग्रामपंचायतसाठी १०७ टेबलवर होणार मतमोजणी

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात ४९५ ग्रामपंचायत पैकी ७३  बिनविरोध झाल्याने ४२२ ग्रामपंचायतसाठी सरासरी ८२.२३ टक्के मतदान झाले.आता सोमवारी ( ता. १८ )  १०७ टेबलवर सकाळी दहा वाजता तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे प्रशासन सज्ज झाले असुन उमेदवारांची मात्र धाकधूक वाढली आहे.

जिल्ह्यात ४२२ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. १५) मतदान झाले  सरासरी ८२.२३ टक्के मतदान झाले. ४९५ पैकी ७३ ग्रामपंचायती  बिनविरोध आल्याने ४२२ ग्रामपंचायतसाठी ४०४१ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. ,त्यापैकी ८१४ उमेदवार बिनविरोध आल्याने ३२०० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. दरम्यान, शुक्रवारी १ हजार २७६  मतदान केंद्रावर  मतदान निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. सरासरी ८२.२३ टक्के मतदान झाले जिल्ह्यात पाच लाख ५५ हजार ६५५ पैकी चार लाख ५७ हजार २३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आता उमेदवारांसह त्यांचे समर्थक व गावकऱ्यांना देखील मतमोजणीची उत्कंठा लागली आहे. 

यासाठी प्रशासनाने मतमोजणीची तयारी केली असून  जिल्ह्यात पाच तालुक्याच्या ठिकाणी सकाळी दहा वाजता १०७ टेबलवर मतमोजणी होणार आहे. यासाठी ६७० अधिकारी कर्मचारी मतमोजणीसाठी काम करणार आहेत. हिंगोली तालुक्याची मतमोजणीची कल्याण मंडपात होणार असून यासाठी २५ टेबल लावण्यात आले आहेत यासाठी ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

वसमत तालुक्याची मतमोजणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत केली जाणार आहे. यासाठी १४ टेबलवर १२० कर्मचारी मतमोजणी करणार आहेत. सेनगाव तहसील कार्यालयात वीस टेबलवर १५० कर्मचारी मतमोजणी करणार आहेत. औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालयात २३ टेबलवर १०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर कळमनुरी येथील तहसील कार्यालयात २५ टेबलवर शंभर कर्मचारी मतमोजणीचे काम करणार आहेत. यासह पोलिस प्रशासन देखील कडक बंदोबस्त ठेवणार आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK, Asia Cup: भारतच ठरला 'बॉस', पाकिस्तानच्या ठेचल्या नांग्या; कर्णधार सूर्यकुमारचं वाढदिवशी भारतीयांना स्पेशल गिफ्ट

IND vs PAK, Asia Cup: अरर! पाकिस्तानच्या राष्ट्रगीतापूर्वी अचानक मैदानात वाजलं 'जलेबी बेबी'; Video तुफान व्हायरल

Vijay Vadettiwar: आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांकडून बनवाबनवी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका; लढा देण्याचा निर्धार

IND vs PAK: अक्षरच्या गोलंदाजीवर मोठा शॉट मारायला गेला पण…; शानदार झेल घेत तिलकने झमानला दाखवला ‘शॉर्टकट टू पॅव्हेलियन’, पाहा व्हिडिओ

Minister Nitin Gadkari: पाणी व्यवस्थापनाने शेतकरी ऊर्जादाता: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; नाम फाउंडेशन दशकपूर्तीनिमित्त कार्यक्रम

SCROLL FOR NEXT