Hingoli News 
मराठवाडा

दोन दिवसानंतर सापडला पती-पत्नीचा मृतदेह, पुरात बैलगाडीसह गेले होते वाहून

सकाळ वृत्तसेवा

कळमनुरी (जि.हिंगोली) : दोन दिवसांपूर्वी ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या कुंडलिक असोले यांचा मृतदेह रविवार (ता. २२ जून) सकाळी सहा वाजता पुयना तलावात आढळून आला. त्यानंतर त्यांचा शोध घेणाऱ्या नागरिकांनी तो पाण्याबाहेर काढून शवविच्छेदन केले. असोलवाडी या त्यांच्या गावात शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शुक्रवार (ता.१९ जून) सायंकाळी सहाच्या सुमारास कुंडलिक असोले आणि पत्नी धुरपतबाई असोले हे शेतातील आखाड्यावर बैलगाडी घेऊन निघाले होते. दरम्यान पुल नसल्यामुळे ओढ्यातूनच वाट काढून शेतावर जावे लागते. नेहमीप्रमाणे दोघेही पाण्यातून जात होते. परंतु, ओढ्यातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही बैलगाडीसह वाहून गेले. त्यानंतर परिसरातील  नागरिक व प्रशासनाच्या वतीने ओढ्याच्या व तलावाच्या परिसरात शोध मोहीम हाती घेतली होती. दरम्यान शनिवार (ता. २० जून) सकाळी तलावाच्या परिसरात धुरपतबाई आसोले यांचा मृतदेह आढळून आला होता.

इथेच कुठेतरी कुंडलिक असोले यांचाही मृतदेह असेल, म्हणून दिवसभर शेकडो नागरिकांनी हा परिसर पिंजून काढला. मात्र, तरीही कुंडलिक आसोले आढळून आले नाही. त्यानंतर तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी या प्रकाराची माहिती जिल्‍हा आपत्‍ती कक्षाला देऊन पुणे येथील एनडीआरएफ यांच्याकडेही मदतीची मागणी केली होती. दिवसभर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध मोहीम राबविल्यानंतर सायंकाळी उशिरा ही शोध मोहीम थांबविण्यात आली.

दरम्‍यान रविवार सकाळी सहा वाजताच पुयना तलावामध्ये कुंडलिक आसोले यांचा शोध घेण्यासाठी नायब तहसीलदार श्रीराम पाचपुते, समशेर पठाण ,कांता पाटील, असोलवाडी येथील संभाजी माने, तुळशीराम भिसे, माधव आसोले, नामदेव मुकाडे, शिवराम असोले, गजानन डुकरे, राजेश काळे, शालिकराम डाखोरे, संतोष असोले, खोब्राजी काळे यांच्यासह नागरिक दाखल झाले होते. 

शनिवारी  झालेल्या पाण्यामुळे तलावाची पाणी पातळी वाढून गाळात अडकलेल्या कुंडलिक असोले यांचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती नायब तहसीलदार श्री. पाचपुते यांनी पोलीस व वरिष्ठांना दिली आहे. कळमनुरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून कुंडलिक आसोले यांच्यावर त्यांचे मूळ गावी असलेल्या असोलवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: रेल्वे प्रशासनाचा अ‍ॅक्शन मोड! लोकलमध्ये तळीरामांवर कठोर कारवाई, 'ड्रंक अँड ट्रॅव्हल 'ची विशेष मोहीम

Mumbai News: जुहूमध्ये नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू, मॉन्सूनपूर्व कामांवर प्रश्नचिन्ह; निष्काळजीवर संताप

Pune Sports: पुण्यातील खेळाडूंसाठी आनंदाची बातमी! महापालिकेची क्रीडा शिष्यवृत्ती योजना पुन्हा सुरू, चार वर्षांचा खंड संपला..

Latest Marathi News Update : पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते

PM Modi : सोने आणि पेट्रोलबाबतच्या आवाहनाचा परिणाम दिसतोय,लोक प्रतिसाद देताहेत; पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये सांगितले अनेक अनुभव

SCROLL FOR NEXT