covid 19
covid 19 covid 19
मराठवाडा

Covid 19 Updates: मराठवाड्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात

सकाळ वृ्त्तसेवा

औरंगाबाद: मराठवाड्यात कोरोना रुग्णसंख्येत मंगळवारी (ता. ८) आणखी घट झाली. दिवसभरात ६३८ जणांना कोरोनाची लागण झाली. जिल्हानिहाय नव्या रुग्णसंख्येत औरंगाबाद १४५, बीड १३२, उस्मानाबाद १२४, नांदेड ११६, लातूर ५१, जालना ३७, परभणी २५, हिंगोली ८. काल (ता. ७) ६७९ बाधित आढळले होते. उपचारादरम्यान आणखी ३९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात लातुरमध्ये १५, औरंगाबाद ९, बीड ७, जालना ६ तर नांदेडमधील दोघांचा समावेश आहे. काल ४१ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद होती.

औरंगाबादेत १४५ बाधित-
औरंगाबाद जिल्ह्यात १४५ रुग्णांची भर पडली. त्यात शहरातील १५१, ग्रामीण भागातील ७१ जण आहेत. रुग्णांची संख्या १ लाख ४४ हजार ९१ वर पोचली. आणखी २२२ रुग्ण बरे झाले. त्यात शहरातील १५१ तर ग्रामीण भागातील ७१ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत १ लाख ३८ हजार ६३८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या २ हजार १६० जणांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात आणखी नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. पवननगर सिडको एन-नऊ भागातील महिला (वय ३८), बेगमपूरा येथील पुरुष (५४), वडवळी (ता. पैठण) येथील महिला (५५), एकटूनी येथील पुरुष (३५), नक्षत्रवाडी पैठणरोड येथील पुरुषाचा (६०) घाटी रुग्णालयात तर खासगी रुग्णालयात चौघांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ३ हजार २९३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar hoarding: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

CM Eknath Shinde : त्यांच्यासोबत पाकिस्तानची बोली बोलणारे बसतात; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

SCROLL FOR NEXT