file photo 
मराठवाडा

Covid-19 : हिंगोलीत आज पुन्हा नव्याने सहा पॉझिटिव्ह, संख्या गेली १९२ वर 

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : शुक्रवारी (ता.पाच जून) अंधारवाडी येथील क्‍वारंटाईन सेंटरमध्ये भरती असलेल्या सहा व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालातून स्‍पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या १९२ वर गेल्याचे जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीबास यांनी दिली. 

हिंगोली जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गुरुवारी (ता.चार जून) चौंढी खुर्द (ता.सेनगाव) येथील १७ वर्षीय युवक व हयातनगर (ता.वसमत) येथील दोन व्यक्तिंना कोरोनाची लागन झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. शुक्रवारच्या अहवालामधअये अंधारवाडी येथील क्वारंटाइन केंद्रामध्ये भरती असलेल्या सहा व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णात २८ वर्षीय महिला व ११ वर्षीय मुलगा हे रिसाला बाजार येथील कोरोना रुग्णाच्या कुटूंबातील व्यक्‍ती आहेत. ते सर्वजण मुंबई येथून हिंगोलीत आल्यापासून अंधारवाडी येथील क्‍वारंटाईन केंद्रात थांबलेले होते.  

तसेच शुक्रवारच्या अहवालातील एक ३३ वर्षीय पुरुष नगरपरिषद कॉलनी हिंगोली येथील रहिवासी आहे. तो व त्‍याचे कुटूंब पुणे येथून हिंगोली येथे आलेले आहेत. यासह ३० वर्षीय पुरुष, २७ वर्षीय महिला व नऊ वर्षाची मुलगी हे सर्व एकाच कुटूंबातील सदस्य असून ते मुंबई मधून हिंगोली येथे आले आहेत. सध्या हिंगोली जिल्‍ह्‍यात कोरोनाचे एकूण १९२ रुग्ण झालेले असून त्‍यापैकी १६१ रुग्ण बरे झाल्याने त्‍यांना डिस्‍चार्ज देण्यात आला आहे.  सद्यस्‍थितीत एकूण ३१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे डॉ. श्रीबास यांनी सांगितले. या सर्व रुग्णांवर तज्‍ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत. 

दरम्‍यान, हिंगोली जिल्‍ह्यात मुंबई येथून येणारे व्यक्‍ती आतापर्यत पॉझीटीव्ह निघत असल्याचे दररोज येणाऱ्या अहवालातून स्‍पष्ट होत आहे. एक व्यक्‍ती पॉझीटीव्ह निघाल्यावर त्‍यांच्या संपर्कात आलेले व्यक्‍ती देखील पॉझीटीव्ह येण्याचे प्रमाण वाढत आहे. विविध कोरोना सेंटर व आयसोलशेन वार्डात दाखल असलेल्यांची तज्ज्ञ टिमतर्फे योग्य तपासणी होत असल्याने हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील कमी होत आहे. मात्र मुंबईचे आलेले व्यक्‍ती कोरोना बाधीत होत असल्याचे स्‍पष्ट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Lonavala Tourism: पाऊस पडतोय अन् मावळ सजतोय! धबधबे, घाट, किल्ले अन् धरणांचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Sugar Stock Limit: मिठाई विक्रेत्यांनो लक्ष द्या! साखर साठवणुकीचा नवा नियम, अतिरिक्त साठा ठेवल्यास कारवाई होणार, मर्यादा किती?

पावसाळा संपताना फिरायला निघा! सप्टेंबरमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यासाठी ५ भन्नाट ठिकाणं

थलपती विजय यांचा दारूच्या गुणवत्तेबाबत मोठा निर्णय; अल्कोहोलचं प्रमाण तपासणार

SCROLL FOR NEXT