covid 19 covid 19
मराठवाडा

चांगली बातमी! मराठवाड्यातील कोरोना रुग्णसंख्येत होतेय घट

मराठवाड्यात उपचारादरम्यान १४० जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: मराठवाड्यात रविवारी (ता. ९) दिवसभरात ५ हजार १८७ कोरोनाबाधित आढळले. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्येमध्ये बीड १२७३, लातूर ९५७, औरंगाबाद ७५९, उस्मानाबाद ७१२, जालना ५६६, परभणी ४६२, नांदेड ३३७, हिंगोली १२१ रुग्ण वाढले (marathwada covid 19 updates )आहेत. उपचारादरम्यान १४० जणांच्या मृत्यूची नोंद आज (death rate) झाली. त्यात लातूर-बीडमध्ये प्रत्येकी २९, औरंगाबाद २२, नांदेड १९, जालना १६, परभणी १२, उस्मानाबाद ८, हिंगोली ५ जणांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात २२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ७५५ जणांचा मृत्यू झाला आहे. सिल्लोड येथील महिला (वय ५०), नक्षत्रवाडी येथील पुरुष (७७), वैजापूर येथील पुरुष (६०), फुलंब्री येथील पुरुष (५५), खोपरखेडा (जि. औरंगाबाद) येथील पुरुष (५०), कन्नड येथील पुरुष (५०), सिल्लोड येथील पुरुष (४५), सिडको एन-१२ येथील पुरुष (७२), कन्नड येथील पुरुष (४७), पैठणरोड, औरंगाबाद येथील पुरुष (४५), वैजापूर येथील महिला (६०), वाळूज येथील पुरुष (३५), सिल्लोड येथील महिला (५०), पैठण येथील (५५) व (६०) वर्षीय दोन पुरुष, गंगापूर येथील महिला (६५), सिल्लोड येथील महिला (७३), भावसिंगपुरा येथील पुरुषाचा (५७) घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. शिरोडी (ता. फुलंब्री) येथील महिलेचा (६५) जिल्हा रुग्णालयात तर जातेगाव (ता. फुलंब्री) येथील महिला (४०), रांजणगाव (ता. पैठण) येथील महिला (४५), खोकडपुरा येथील पुरुषाचा (५३) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

औरंगाबादेत आणखी तेराशे रुग्ण बरे
औरंगाबाद जिल्ह्यात ७५९ कोरोनाबाधितांची भर पडली. यात शहरातील २७७, ग्रामीण भागातील ४८२ जणांचा समावेश आहे. रुग्णसंख्‍या १ लाख ३२ हजार ३६९ झाली. आणखी १ हजार ३०४ रुग्ण बरे झाले. त्यात शहरातील ४८४ व ग्रामीण भागातील ८२० जणांचा समावेश आहे. आजपर्यंत १ लाख २१ हजार ५४४ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ८ हजार ७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT