covid 19 covid 19
मराठवाडा

Corona Updates: मराठवाड्यात २४ तासांत कोरोनाच्या ५८५ रुग्णांची भर

तसेच मागील २४ तासांत मराठवाड्यात आणखी वीस जणांचा मृत्यू झाला आहे

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: मराठवाड्यात शुक्रवारी (ता. १८) कोरोनाचे ५८५ रुग्ण आढळले. जिल्हानिहाय वाढलेल्या रुग्णसंख्येत बीड १५६, उस्मानाबाद १४१, औरंगाबाद १३०, परभणी ४९, लातूर ३९, जालना ३२, नांदेड २६, हिंगोली १२ जणांचा समावेश आहे. उपचारादरम्यान आणखी २० जणांचा मृत्यू झाला. त्यात औरंगाबादेत ५, लातूर-बीडमध्ये प्रत्येकी ४, जालना ३ , उस्मानाबाद २, नांदेड-परभणीतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

औरंगाबादेत १३० बाधित-

औरंगाबाद जिल्ह्यात १३० कोरोनाबाधित आढळले. रुग्णांची संख्या १ लाख ४५ हजार २६४ झाली. सध्या एकूण १ हजार ९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या २०३ जणांना सुटी देण्यात आली. त्यात महापालिका क्षेत्रातील २५, ग्रामीण भागातील १७८ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत १ लाख ४० हजार ८०० रुग्ण बरे झाले आहेत.

आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. बिडकीन येथील पुरुष (वय ५०), म्हाडा कॉलनीतील पुरुष (७८), उस्मानपूरा येथील महिला (६५), अंभई (ता. सिल्लोड) येथील पुरुषाचा (७६) घाटी रुग्णालयात तर हर्सूल येथील महिलेचा (४१) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. आजपर्यंत ३ हजार ३७२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पठारे विरुद्ध पठारे! मार खाणारा तो सचिन पठारे मी नाही...; पुण्यातील राष्ट्रवादीच्या 'त्या' राड्याला अनोखे वळण

AUSW vs PAKW: ७९-७ वरून २२१ धावा! पाकिस्तानने लावलेली वाट, पण ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी-एलना किंग राहिल्या ताठ! वर्ल्ड रेकॉर्डही नावावर

Sridhar Vembu's Zoho success story : कुणाकडून रुपयाचीही मदत न घेता, फक्त मित्र अन् कुटुंबाच्या पाठबळावर उभारली तब्बल 100000 कोटींची कंपनी!

Pune News : विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षेसाठी १४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार

Latest Marathi News Live Update : उमरखेड - ढाणकी रोडवर चक्काजाम आंदोलन

SCROLL FOR NEXT