covaxin covaxin
मराठवाडा

तासात संपला Covaxin लसीचा साठा; लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी

एरवी केंद्रावर लस घेणाऱ्या नागरिकांची प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, कोव्हॅक्सीन लस उपलब्ध होताच हे चित्र बदलले व लसीसाठी गर्दी झाली

विकास गाढवे

लातूर: मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांश केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस उपलब्ध झाल्याने नागरिक तसेच युवकांनी ही लस घेण्यासाठी गर्दी केली. एरवी लसीकरणासाठी दिवसभर नागरिकांची प्रतीक्षा सुरू असताना कोव्हॅक्सीनची लस तासातच संपत असल्याचे चित्र केंद्रावर दिसून आले. यामुळे कोव्हॅक्सीनची पसंती कायम असल्याचे दिसत असून, साठा संपलेली कोविशिल्ड लस उपलब्ध झाली आहे. दोन्ही लसीचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्याने शनिवारपासून (ता. तीन) कोविशिल्ड नियमित उपलब्ध होणार आहे.

कोविशिल्ड लसीचा साठा संपल्याने तसेच कोव्हॅक्सीनच्या दुसऱ्या डोसचे लाभार्थी संपत आल्याने आरोग्य विभागाने जिल्ह्यातील बहुतांश केंद्रावर मागील दोन दिवसांपासून सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी दुसऱ्यासोबत पहिल्या डोससाठी कोव्हॅक्सीन लस उपलब्ध केली. ही माहिती कळतात नागरिकांनी केंद्रावर लस घेण्यासाठी रांगा लावल्या. एरवी केंद्रावर लस घेणाऱ्या नागरिकांची प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, कोव्हॅक्सीन लस उपलब्ध होताच हे चित्र बदलले व लसीसाठी गर्दी झाली. कोविशिल्डपेक्षा नागरिकांची कोव्हॅक्सीनला अधिक पसंती आहे. २८ दिवसांत दुसरा डोस मिळून लसीकरण पूर्ण होत असल्यानेही नागरिक या लसीला प्राधान्य देत आहेत. मात्र, मागील अनेक दिवसांपासून या लसीचा केवळ दुसरा डोस देण्यात येत होता. पहिल्या डोससाठी ही लस उपलब्ध होत नव्हती.

दोन दिवसांपूर्वी कोविशिल्ड लसीचा साठा संपल्याने तसेच कोव्हॅक्सीनच्या दुसऱ्या डोसचे लाभार्थींत घट झाल्याने कोव्हॅक्सीन सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी पहिल्या व दुसऱ्या डोससाठी उपलब्ध करण्यात आली. त्याची माहिती मिळताच युवक व नागरिकांनी सकाळपासूनच केंद्रावर गर्दी करीत रांगा लावल्या. यामुळे शंभर ते दोनशेच्या संख्येने डोस तास ते दोन तासात संपत आहे. कोव्हॅक्सीनमुळे मंद गतीने सुरू असलेल्या लसीकरणात अचानक उत्साह संचारला आहे. दरम्यान, साठा संपलेली कोविशिल्ड तसेच कोव्हॅक्सीनची लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली असून येत्या काळात दोन्ही लसीचे लसीकरण पूर्ववत सुरू राहणार असल्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना पंडगे यांनी सांगितले.

लसीकरण साडेपाच लाखांवर
जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ६२ हजार १५६ नागरिकांनी कोविशिल्ड तर ८९ हजार ९२३ नागरिकांनी कोव्हॅक्सीन लस घेतली आहे. पाच लाख ४३ हजार ८५१ नागरिकांनी लस घेतली असून, त्यात तीन लाख एक हजार ३४१ पुरुष तर दोन लाख ४२ हजार ५१० महिलांचा समावेश आहे. फ्रंट लाइन कर्मचाऱ्यांचे १०५ टक्के लसीकरण झाले असून, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे प्रमाण ८२ टक्क्यापर्यंत पोचले आहे. १८ ते १४ वर्ष वयोगटातील युवकांचे सात तर ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण ४२ टक्क्यापर्यंत झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 2nd ODI : ४१ धावा अन् रोहित शर्मा 'मोठ्या' खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसेल, जबरदस्त विक्रम नोंदवण्याची संधी

Nagpur Tiger: सालेघाट जंगलात वाघाचा संशयास्पद मृत्यू; कोणतीही जखम नाही, वनविभागाचा तपास सुरू

Latest Marathi News Live Update :दिल्ली विद्यापीठाच्या दोन महाविद्यालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी

Sinnar Election : मतदान केंद्रावर 'मिरची स्प्रे'चा हल्ला; सिन्नरमध्ये गोंधळ, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार

Vastu Tips For Money: तुमच्याही खिशात पैसे राहत नाहीत का? मग धनवाढीसाठी करा 'हे' खास उपाय

SCROLL FOR NEXT