3Corona_102
3Corona_102 
मराठवाडा

उस्मानाबाद जिल्ह्यात ८४ नवीन कोरोनाबाधित, दोघांचा मृत्यू

सयाजी शेळके

उस्मानाबाद : जिल्ह्यात मंगळवारी (ता.१३) कोरोनाबाधित नवीन ८४ रुग्णांची भर पडली, तर दोघांचा मृत्यू झाला. आता एकूण बाधितांचा आकडा १३ हजार सहा इतकी झाला आहे. दरम्यान मंगळवारी मृत्यूचा आकडा कमी झाल्याने जिल्ह्यासाठी समाधानाची बाब ठरली आहे. विशेष म्हणजे तब्बल ३९१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत उपचार घेऊन घरी परतणाऱ्यांची संख्या ११ हजार ७५३ एवढी झाली आहे. मंगळवारी १२८ स्वॅब नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १३ पॉझिटीव्ही आढळून आले आहेत, तर ५५७ जणांची अँटिजेन टेस्ट घेण्यात आली. यामध्ये ६२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह, तर ४९५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.


उस्मानाबाद तालुक्यात ३६ रुग्ण
जिल्ह्यात सर्वाधिक उस्मानाबाद तालुक्यात ३६ रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय कळंब तालुक्यातील तब्बल २१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान इतर तालुक्यात मात्र नगन्य संख्या आहे. तुळजापूरमध्ये सहा, उमरगा दोन, लोहारा सहा, वाशी पाच, भूम दोन, तर परंड्यात पाच रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्णसंख्या घटली
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या घटत असली तरी मृत्यूचे प्रमाण कमी होत नव्हते. दरम्यान मंगळवारी दोघांचा मृत्यू झाला. हीच प्रशासनासाठी समाधानाची बाब ठरली आहे, असे असले तरी तब्बल ३९१ रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. दरम्यान अजूनही एक हजार ३२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT