फोटो 
मराठवाडा

COVID19 : रेणूकादेवीचे दर्शन आता आॅनलाईन 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : सध्या संबंध जगात जीवघेण्या कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. हा आजार आपले हातपाय झपाट्याने वाढवत असल्याने खबरदारी म्हणून जास्त गर्दीच्या ठिकाणी संसर्ग होऊ नये म्हणून अनेक मंदीराचे दर्शन रद्द करण्यात आले आहे. त्याच धरतीवर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या साडेतीन पिठापैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहुरच्या देवीचे दर्शनही खबरदारी म्हणून आॅनलाईनद्वारे करण्यात आले आहे.

त्यासाठी भाविकांची गैरसोय टळावी म्हणून श्री. रेणूका देवी न्यासकडून वेबसाईट कार्यान्वीत करण्यात आली आहे. त्या वेबसाईटचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा न्यासचे पदसिद्ध अध्यक्ष न्या. दीपक धोळकिया यांच्या हस्ते गुरूवारी (ता. १९) करण्यात आले. आता रेणुका देवीचे दर्शन आॅनलाईन करण्यात आले आहे.

नागरिकही प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत आहेत

कोरोना या आजाराशी सामना करण्यासाठी राज्यातील नव्हेत सबंध जगभरातील नागरिक खबरदारी घेत आहेत. शासन व प्रशासनाकडून नागरिकांना या आजाराबाबत सजग राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. हा आजार झपाट्याने फैलावत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी जिल्ह्यातील शाळा, क्लब, व्यायामशाळा, अभ्यासिका, महाविद्यालय, खासगी शिकवणी, जीम, आठवडे बाजार, लग्नसमारंभ, यात्रा तसेच मंदीर दर्शन ता. ३१ मार्चपर्यंत रद्द केले आहेत. नागरिकही प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत महत्वाचे काम असले तरच घरातून बाहेर पडत आहेत. 

( www.shreerenukamatamandir.org )

जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या देवस्थानांनी सुद्धा खबरदारी घेऊन भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले आहे. श्री. रेणूका देवी माहूर न्यासाच्या वतीने गुरूवारी (ता. १९) मंदीर न्यासाचे पदसिद्ध अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक धोळकिया यांनी भाविकांसाठी श्री. रेणूका देवीचे दर्शन ( www.shreerenukamatamandir.org) वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले आहे. कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर गडावरील नवरात्र उत्सवानिमित्त होणारी गर्दी टाळण्यासाठी ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. 

प्रमुख जिल्हा न्यायाधीश धोळकिया यांचे आवाहन

नवरात्रनिमित्त होणारे सर्व कार्यक्रमाच्या व्हिडीओ फुटेज या वेबसाईटवर तात्काळ उपलब्ध करुन दिले जातील. तसेच आगामी काळात भाविकांना थेट आॅनलाईन दर्शनची सोयही केली जाणार आहे. भाविक या वेबसाईटद्वारे विविध पूजा- विधी तसेच देणगीही देऊ शकणार आहेत. त्यासाठी एसबीआयची इकॉलेक्ट (icollect) ही व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी या साईटचा उपयोग करावा तसेच काही सुचना असल्यास न्यायासाकडे पाठवाव्यात असे आवाहन न्यायाधीश दीपक धोळकिया यांनी केले आहे.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Prices: 253 दिवस... 6,072 तास... सोन्याच्या भावात 34,050 रुपयांची वाढ; दिवाळी पर्यंत किती वाढणार सोनं?

Latest Marathi News Updates : अक्कलकोटमधील वागदरी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस

Billionaires List : इलॉन मस्कला टाकले मागे, ८१ व्या वर्षी बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; जाणून घ्या कोण आहेत लॅरी एलिसन?

Javelin Throw Competition; अहिल्यानगरच्या शिवमने मोडला ‘गोल्डन बॉय’ नीरजचा विक्रम; भालाफेकमध्ये ८४.३१ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी

IMD Weather Update : राज्यात पुन्हा पावसाचा जोर! 'या' तारखेला परतीचा मान्सून धडकणार, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT